• Contact Us
  • Home
Thursday, February 5, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

डॉ.रसिका पारगावकर महिलांच्या आरोग्यसेवेत दाखल….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 8, 2025
in ताज्या बातम्या
0


बीड (प्रमोद कुलकर्णी) महिलांच्या आरोग्य विषयक तक्रारी, समस्या, आजारपण आणि त्यासाठी तज्ञ महिला डॉक्टर- वैद्य यांचे मार्गदर्शन, निराकारण आणि उपचार मिळाले पाहिजेत हे मानसिक समाधानाचे पहिले औषध,हा प्रथमोपचार महत्त्वाचा असतोच…
स्त्रीरोग चिकित्सा आणि पंचकर्म आयुर्वेद उपचारासह निरोगी आयुष्यासाठीचे सेवा दालन आपल्या बीड शहरातील नव्या भागात मध्यवर्ती अंबिका चौकाजवळ डॉ. रसिका पारगांवकर 5 सप्टेंबर पासून सुरू करत आहेत.
चकलांबा हे जाज्वल्य जागृत मारुतीराया (रोकडेश्वर)चे देवस्थानचेगाव ,येथील सेवेचा वसा जपत, आर्ट ऑफ लिविंग म्हणजे निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची कला, यावरचा महामंत्र देणारे अध्यात्मिक योग गुरु श्री श्री रविशंकरजी यांचे कृपा सानिध्य प्राप्त इंजिनियर संतोषराव पारगावकर यांनी बीड शहरात प्रपंचासोबत समाजकार्याची आदर्श जोड ठेवत सौभाग्यवती स्नेहा यांच्या साथीने प्रपंच नेटका करत असताना मुलगा इंजिनियर आशुतोष तर कन्या डॉ रसिका यांनी आयुर्वेदात “एमएस” (पोस्ट ग्रॅज्युएशन ला (MS) सुवर्ण पदक)होईपर्यंतचा प्रवास आनंद देत आणि घेत केला आहे.
कांची शंकराचार्यापिठाच्या आशीर्वाद बळावर चालणाऱ्या ट्रस्टमार्फत चेन्नई येथील प्रसिद्ध आयुर्वेद महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारे डॉ.रसिकां नी प्रवेश मिळवत आयुर्वेद अभ्यासक्रम करत असतानाच तेथील हॉस्पिटलमध्ये केवळ स्त्रियांसाठीच्या आरोग्यावर अभ्यास आणि प्रत्यक्ष सेवा कार्य केले आहे .शाळा-महाविद्यालयात जाणार्या तरुण मुली तसेच working women यांच्यामध्ये असणार्या “वेदनायुक्त पाळी” या व्याधीमध्ये विशेष चिकित्सा या विषयामध्ये महाविद्यालयीन काळामध्ये प्रबंध सादर केला त्याच कौतुक आणि मोठं स्वागत वैद्यकीय जाणकारांनी केले.
निरोगी कसं राहता येईल? हाच मूळ अभ्यास आणि आयुर्वेदाचे महत्त्व आज पटत आहे. जगाच्या पाठीवर आयुर्वेद चिकित्सा सर्वात जुनी आणि महत्त्वपूर्ण आहे हे समाजाला समजून येत आहे.
डॉ .रसिका संतोषराव पारगांवकर यांनी बीड शहरात विशेषतः महिला वर्गांसाठी आयुर्वेदिक उपचार, स्त्रीरोग चिकित्सा आणि पंचकर्म सेंटरची सुरुवात शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी, आपल्या परिवाराचे आध्यात्मिक सद्गुरु सुरेश महाराज रामदासी (श्रीराम संस्थान साडेगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत करत आहे. मातृशक्ती सौ.स्नेहा यांनी मुलावर संस्कार करण्याचे प्रथम कर्तव्य निभावत, समाजातील महिला शक्तीजागृती, अध्यात्मिक आणि शिक्षण, संस्कार या परिघात आपली सेवा समर्पण करतात.
देवधर्म, साधू संत महात्मे, अध्यात्मिक आणि समाजसेवेतील आशीर्वादाची कवच कुंडलांची शक्ती आपल्या परिवाराप्रमाणे मुख्यत्वे महिलानां शक्ती, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची कला त्यांना साध्य व्हावी यासाठीचा हा डाॅ. रसिकाचा आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म सेवा योजनेचा यज्ञ सफल होणारच आहे,या साठी उद्घाटन प्रसंगी आपल्या उपस्थितीने शुभेच्छा देवू या…
प्रमोद कुलकर्णी, पत्रकार बीड.
(९४०३९०४६५१)

Previous Post

Next Post

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पीएनजीची “प्युअर प्राइस ऑफर.”

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पीएनजीची “प्युअर प्राइस ऑफर.”

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.