
“आठवणी – लोकनेते मेटे साहेबांच्या”
जगातील सगळ्यात ‘मोठी वेदना’ म्हणजे अशा लोकांची ‘आठवण’ ज्यांना विसरता येत नाही आणि पुन्हा भेटताही येत नाही. “आठवणीतील मेटे साहेब” असा एक अभिवादनाचा कार्यक्रम १३ जुलै रोजी मुंबईत होत आहे, यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत.

काही लोक आठवणींना उजाळा देतील पण अनेकांच्या क्षणोक्षणी विनायकराव मेटे साहेब आजहीसोबत आहेत, त्यांचा सहवास ,स्पर्शाने, डोळ्याने जाणवत दिसत नसला तरी “साहेबांसाठी सर्वकाही” ही भावना घेऊन वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसंग्राम परिवार हे घरकुल एक मोठं कुटुंब मेटे साहेबांनी कष्टाने उभा केलेलं आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक निघून गेलाय… समाजासाठी काहीतरी भलं करण्याचा वसा चालवत असताना अपघात झालाय…’ मराठा ‘म्हणून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत धडपड – संघर्ष, सक्रिय संघटन वाढवत आठरा पगड जाती जमातीसाठी देखील मनात कायम न्याय भूमिका आणि वर्तन, पाठराखण करणारा नेता म्हणून मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर चालत असताना हा अपघात झालाय… दृष्ट लागावी तसा नियतीने डाव टाकलाय…
कुटुंबात कोणताही वारसा नसताना आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातून जगावं कसं ? समाजकारण राजकारण करावं कसं ? याचा आदर्श वस्तूपाठ या शिवसंग्राम कुटुंबाला आणि समाज व्यवस्थेला देखील ते देऊन गेले . त्यांची शिकवण , त्यांचे जीवनदर्शन शिवसंग्राम कुटुंबाला विसरणे अशक्य आहे,” विसरलेच नाही तर आठवण काढण्याचा प्रश्न येत नाही”? .
शिवसंग्राम परिवार मोठ्या अपघातामुळे अजूनही फारसा सावरलेला नाही, हळहळ मनात व्यक्त होतच असते, साहेबांचा वाढदिवस, नव वर्षाचे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन, युवक मेळावे, सामूहिक लग्न सोहळे, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी- शिक्षणासाठीची धडपड. मराठवाडा विकास मंचावरून पाठीवर थाप, संकट समयी धावून जाणारे, तोरणदारी तर सर्व मंगल प्रसंगात आपल्या कुटुंबा सारखं कार्यकर्त्यांच्या सोबत राहात वातावरणात उल्हास भरत ,भरभरून प्रेम करणारे विनायकराव मेटे साहेबांचा ज्यांना सहवास लाभला, साथ मिळाली, आधार मिळाला असे अनेक कुटुंब या शिवसंग्राम परिवारात जोडले गेलेले आहेत, ते केवळ बीड विधानसभा क्षेत्र, जिल्हा ,विभाग नव्हे तर ‘महाराष्ट्रभर मराठा आणि मराठी जिथे तिथपर्यंत’ शिवसंग्राम चा परिवार सदस्य जोडलेला आहे, तोच विनायकराव मेटे साहेबांचा वसा आणि वारसा डॉ.ज्योतीताई मेटे पुढे घेऊन जाणारी मातृशक्ती म्हणून शिवसंग्राम परिवाराची या घरकुलाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असल्याचे मेटे साहेबांच्या पाश्चात दिसून येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचें त्रिशताब्दी जन्म महोत्सव वर्ष साजरे होत असताना ,बालपणी त्यांनी नदीकाठी वाळू माती खेळत असताना, आपल्या हाताने तयार केलेली महादेवाची पिंड ,घोड्याच्या टापा खाली येऊन मोडू नये म्हणून ती पिंड दोन्ही हाताने उचलून पोटाजवळ घेत संरक्षण केल्याचे प्रेरणादायी चित्र होळकर घराण्यांनी पाहिलं की देव धर्म आणि देश रक्षण करणारी एक लढाऊ मातृशक्ती चा प्रेरणादायी जीवन पट आठवतो..
लोकनेते विनायकराव मेटे साहेब आपल्यातून निघून गेले पण हे शिवसंग्राम घरकुल परिवार त्यांनी निर्माण केलेला आहे, त्याच्या एकाही कोपरा ,विटेला धक्का लागू नये, साधा वरखडा देखील ओढला जाऊ नये ,सोबत असलेले सर्व कार्यकर्ते हे कुटुंब सदस्य आहेत, त्यांच्यात पोरकेपणाची भावना येऊ नये म्हणून ज्योतीताईंनी आपलं व्यक्तिगत आयुष्य, दुःख, वेदना बाजूला सारून साहेबांनी उभा केलेला हा परिवार सांभाळायचा ,वाढवायचा आणि हे “ज्योतीताईंनीच करावं हा कुटुंबाचा विश्वास” देखील सार्थ करून दाखवत आहेत.
केवळ ‘शिवसंग्राम’ साठी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत उतरावे लागले, यातून निवडणूक कशी असते? कशी लढावी लागते? याची ओळख करून घेत आपला एक आदर्श पॅटर्न देखील रुजवला .कोणत्याच गैरमार्गाचा वापर कार्यकर्त्यांच्या डोक्यात देखील न येणे हा संस्कार त्यांनी रुजवला. बीड मतदारसंघात दहा हजार कुटुंब निखळ शिवसंग्रामशी जोडले गेले असल्याचे पावती या निवडणुकीत त्यांना मिळाली. हे भांडवल ज्योतीताई यांचे “ओन कॅपिटल” त्यांनी उभा केला आहे . लोकनेते स्व.
विनायकराव मेटे साहेबांनी भाजपा, सेना , राष्ट्रवादीला वेळेनुसार साथ देऊन सत्ता स्थानी बसवण्यासाठी मदत केलेली होती, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि मेटे साहेबांची समाज हितासाठीची मैत्री शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पाहिलेली आहे, निवडणुकीपूर्वी म्हणजे २०२३ च्या साठाव्या जयंतीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाची आठवण काढली, त्याला उजाळा दिला तर शिवसंग्राम आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणात त्यांचे स्थान लक्षात येते ,आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाजप सेना राष्ट्रवादीसह सर्व सामाजिक क्षेत्रातील मंडळी ‘आठवणीतील मेटे साहेब ” या अभिवादन कार्यक्रमासाठी येत आहेत, शिवसंग्राम या मोठ्या सामाजिक कुटुंबातील घरात विनायकरावांचा फोटो समोर ज्योतीताई आपलं सर्वस्व पणाला लावत प्रकाश टाकण्याचा, ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता केंद्राचे पाठबळ ,साथ मिळाली तर हे अभिवादन खरं ठरेल, शिवसंग्राम कुटुंब परिवार त्याची योग्य दखल घेत वाटचाल करेल आणि समाजबांधव सर्व अठरापगड जाती धर्मांच्या लोकांच्या मनात मेटे साहेबांचा आदर राखला गेल्याची भावना सत्ताधारी ‘भाऊ- दादा’ बद्दल ची निर्माण होईल…
निमित्ताने –
प्रमोद कुलकर्णी पत्रकार बीड
(९४०३९०४६५१)