• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आज श्री नृसिंह जयंती..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
May 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

नमस्कार..!

दिनाङ्क ११|०५|२०२५

*॥ श्रीनृसिंह जयंती ॥*

🟣 वैशाख शुद्ध चतुर्दशी ही श्रीनृसिंह जयंती होय.

🟣 या दिवशी प्रदोषकाळी नृसिंहाचा जन्म (प्रकटन) झाला.

करिता; पापनाशक आणि पुण्यकारक असे हे जन्मकालाचे व्रत प्रतिवर्षी करावे.

न केल्यास मोठा दोष आहे.
(नृसिंहपुराण- हेमाद्री)

🟣 त्रयोदशीला एकभुक्त रहावे.
(एकवेळा आहार करणें याला एकभुक्त म्हणतात.)

चतुर्दशीचे दिवशी माध्यान्ही मृत्तिका (माती) गोमय, तीळ आणि आवळ्याचा वाटून कल्क करावा किंवा आवळ्याची पावडर वापरून त्याचे उटणे ( करून) अंगाला लावून स्नान करावे.

🟣 पुढील मंत्राने व्रताचा संकल्प करावा..
*उपोष्येऽहं नारसिंह भुक्तिमुक्ति फलप्रद ।  शरणं त्वां प्रपन्नोऽस्मि भक्तिं मे नृहरे दिश  ॥*
(पूजासमुच्चय)

अथवा
*नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे । उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जितः॥*
(निर्णयसिंधू)

या प्रमाणे व्रताचा संकल्प करून; पूजन इ. करण्याकरितां आचार्यांचे “वरण” (नियुक्ती) करावे.

🟣 सायंकाळी धान्यराशीवर उदकयुक्त कलश ठेऊन त्या वर पूर्णपात्र ठेवावे.
त्या पात्रात सुवर्णाची अथवा देवघरातील श्रीनृसिंहाची मूर्ती ( प्रतिमा ) ठेऊन; ध्यानासहित  आवाहनादी षोळशोपचार पूजा करावी.

🟣 पुढील मंत्राने देवाला अर्घ्यदान करावे .

अर्घ्यमंत्र :- *परित्राणाय साधूनां जातो विष्णो नृकेसरी । गृहाणार्घ्यं मया दत्तं सलक्ष्मीर्नृहरिः स्वयम्  ॥*
श्रीलक्ष्मीनृसिंहाभ्यां नमः इदमर्घ्यं समर्पयामि..!

🟣 रात्री जागरण करुन; प्रातःकाळी देवाची पूजा करावी.

( सुवर्ण) प्रतिमा पूजन केलेले असल्यास ;त्या प्रतिमेचे विसर्जन करून; गोप्रदान पूर्वक ती प्रतिमा पुढील मंत्राने उपाध्याला ; मंत्र पूर्वक दान करावी.

दानमंत्र:-
*नृसिंहाच्युत गोविंद लक्ष्मीकांत जगत्पते  । अनेन अर्चा प्रदानेन सफलास्यु: मनोरथाः ॥*

येणेप्रमाणे संकल्प पूर्वक दान केल्यावर; पुढील मंत्राने देवाची प्रार्थना करावी..

🟣 प्रार्थना मंत्र  :-
*मद्वंशे ये नरा जाता ये जनिष्यंति चापरे । तां स्त्वमुद्धर देवेश दुःसहाद्भव सागरात्  ॥ पातकार्णव मग्नस्य व्याधि दुःखांबु वारिधेः। नीचैश्च परिभूतस्य महादुखा गतस्य मे ॥करावलंबनं देहि शेषशायिन् जगत्पते। श्रीनृसिंह रमाकांत भक्तानां भयनाशन ॥ क्षीरांबुधिनिवास त्वं चक्रपाणे जनार्दन ।  व्रतेनानेन देवेश भुक्तिमुक्ति प्रदोभव ॥*
(पूजासमुच्चय)

🟣 या नंतर आपापल्या कुलाचाराप्रमाणे सुवासिन्याऽदी भोजन करून; व्रत सांगता (पारणा) करावी.
____________________

🟣 या वैशाख पौर्णिमेला  कांही विशिष्ट प्रकारची दाने केल्यास; त्याची काही विशेष फलं पुढील प्रमाणे जाणावी..

१} शिजविलेल्या अन्नांसह उदकुंभ दान केल्यास- गोदानाचे फळ.
(जाबाली-अपरार्क)

२} सुवर्ण आणि तिलयुक्त १२ उदकुंभ – ब्रह्महत्या पातकांपासून मुक्ती. 
(जाबाली-अपरार्क)

३} विधियुक्त कृष्णाजिन दान- पृथ्वी दानाचे फळ
(विष्णु)

४} सुवर्ण, मध, तिळ, तूप , यांनी युक्त कृष्णाजिन दान :-  सर्व पापनाश
(विष्णु)

५} तिलस्नान, तिलहोम, तिलपात्र , तिळाच्या तेलाचा दीप,तिलोदकाने पितृतर्पण, मधुयुक्त तिलदान. – ही केली असता महाफल सांगितले आहे.
(ज्योतिषग्रंथ)

🟣 या तिथीस (पौर्णिमेला)स्नान – दान केल्यावाचून राहूं नये.
(भविष्यपुराण)
_____________________

🟣 या दिवशी (पौर्णिमेला) वैशाखस्नानाचे उद्यापन  करावे .  
__________________

🟣 या पौर्णिमेपासून ज्येष्ठ शु. एकादशी पर्यंत श्रीविष्णुंची मूर्ती उदकांत ठेऊन तिची रोज पूजा – उत्सव इत्यादी करावे .

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त…!

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच निवडणूका;सुप्रीम कोर्टाचा आदेश.

Next Post

यापुढे फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद यावरच चर्चा. पंतप्रधान

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

यापुढे फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद यावरच चर्चा. पंतप्रधान

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.