
नमस्कार…!
दि.१३|०२|२०२५
*!! होळी पौर्णिमा विशेष माहिती- सविस्तर पूजा, धुलिवंदन पद्धती !!*
🟣 फाल्गुन पौर्णिमा ही होलिका होय.
🟣 या दिवशी देशभरात होलिका दहन केले जाते.
तथापि अनेक प्रदेश किंवा गावं अथवा कुळं अशी आहेत; त्यांचेकडे *”होलिका दहन”* केले जात नाही.
ज्यांचेकडे होलिका दहन केले जाते त्यांचे करिता; ही माहिती देत आहे.
🟣 *होळी सायान्ही (संध्याकाळी) प्रदोषकाळी करावी.*
(निर्णयामृत & दिवोदासीय & चंद्रप्रकाश & विद्याविनोद)
🟣 *होळी दिवसा पेटऊ नये.* दिवसा होळी करणेंचा मोठा दोष आहे.
तसेच “भद्रा” (योगावर) देखील पेटऊ नये.
संध्याकाळी “भद्रा” असतील तर; “भद्रामुख” सोडून होलिका दहन करावे.
(ज्योतिर्निबंध-नारद & पुराणसमुच्चय-निर्णयामृत- मदनरत्न)

🟣 श्रावण पौर्णिमेचे *”रक्षाबंधन”* आणि फाल्गुनातील *”होलिकादहन”* हे *”भद्रा”* वर (भद्रा नावाचा एक योग असतो; त्यावर) करूं नये.
(भविष्यपुराण-निर्णयामृत)
🟣 *आपल्याकडे बहुतेक लोक दिवसाच होळी करत आहेत; हे चुकीचे आहे.*
_____________________
🟣 *या दिवशी (रात्री) ०८.३६ ते रात्री १०.४३ पर्यंत “भद्रामुख” असलेने या वेळेत होळी पेटऊ नये.*
(सूर्यसिद्धांतीय पंचांग)
🟣 या वर्षीचा प्रदोषकाळी होलिका दहनाचा मुहूर्त :- *सायंकाळी ०६.४१ ते ०८.०६ पर्यंत होळी करावी.*
(सूर्यसिद्धांतीय पंचांग)
🟣 ज्यांचेकडे विवाह – उपनयनाऽदी मंगल कार्ये झालेली आहेत त्यांनी; मंगलकार्यानंतर सहा महिन्यापर्यंत फक्त होलिका पूजा करावी. त्या नंतरचा *विशिष्ट विधी* 😃 करूं नये.
असा शिष्टाचार आहे.
____________________
🟣 *!!अथ होलिका पद्धती !!*
अंगण सारवून – रांगोळीने सुशोभित केलेल्या जमिनीवर मध्यभागी “एरंडाची” (न मिळेल तर; अन्य झाडाची) एक फांदी रोऊन तिच्या सभोवताली वर्तुळाकार वाळलेली लाकडे ,गोव-या यांचा ढीग करावा.
ढुंढाराक्षसी प्रसन्न होऊन; तिच्या पासून होणा-या सर्व त्रासापासून सुटका होऊन; सर्व अशुभांचे शमन होण्यासाठी; म्हणून संकल्प पूर्वक- सोळा उपचारांनी पूजा करावी. पुरणपोळी, फळं, नारळं अर्पण करावी. गंधाक्षतपुष्पाने अर्घ्यदान करावे. प्रदक्षिणा- प्रार्थना करावी. ब्राह्मण-सुवासिनी भोजन घालावे. दक्षिणा देऊन संतुष्ट करावे.
गावाची होळी ग्रामप्रमुखाने पेटवावी.
🟣 *!! प्रत्यक्ष पूजा पद्धती !!* :-
वरती सांगितल्याप्रमाणे होळी रचून- सर्व पूजा साहित्य घेऊन , हातात पाणी घेऊन देशकालादींचा उच्चार करून पुढील संकल्प करावा …
*मम सपरिवारस्य श्रीढुंढाराक्षसी प्रीतिद्वारा तत् कर्तृक विविध बालजन उपसर्ग अग्निबाधा उत्पात् भय प्रशमन पूर्वकं क्षेमायुः पुष्टिमय ऐश्वर्य सुख संपत् कुलअभिवृद्धी आदी अभीष्ट फल सिद्धिकामः श्रीहोलिका पूजनं करिष्ये ।*
असा संकल्प करून; रचलेल्या त्या होळीवर “अपवित्रत्व” जाण्यासाठी पळीभर पाणी प्रोक्षण करावे.
शक्य होईल तर; चांडाळ अथवा बाळंतिणीच्या घरातील अग्नीने अथवा अन्य लौकिक अग्नीने होलीका प्रदीपन करावे.
( शक्यतो दोन-तीन गोव-या आधी पुढे घेऊन ; तेव्हढ्याच पेटवून संपूर्ण पूजा करावी. म्हणजे सर्व होळी पेटवून जर मोठ्या ज्वाळा झाल्यातर ;पूजा नीट करता येणार नाही. )
🟣 होलिका पेटविण्याचा मंत्र:- *दीपयामि अद्यते घोरां चितिं राक्षससत्तमे । हिताय सर्व जगतां प्रीतये पार्वतीपतेः ॥*
या मंत्राने होलिका पेटवून पुढील मंत्राने ध्यान करावे.
🟣 होळीच्या ध्यानाचा मंत्र :- *सप्त हस्तां चतुःशृंगीं सप्त जिव्हां द्वि शीर्षकां । त्रिपदां हृष्ट वदनां सुखासीनां शुचिस्मितां ॥*
*मेषारूढां अग्निरूपां जिव्हाललन भीषणां । तप्तकांचन संकाशां होलीकां हृदि चिंतये ॥*
अशाप्रकारे ध्यान करून; पुढील मंत्राने पूजा करावी.
🟣 पूजा मंत्र :- *अस्माभिः भय संत्रस्तैः कृतात्वं होलिके यतः। अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव ॥*
या मंत्राने सोळा उपचारांनी पूजा करावी.
पुरणपोळी चा नैवेद्य होळी मध्ये ठेवावा. नारळ , फळं अर्पण करावी.
त्या नंतर पळीभर पाणी घेऊन त्यात गंधाक्षतपुष्प फलदक्षिणा घेऊन पुढील मंत्राने अर्घ्यदान करावे..
🟣 अर्घ्यदानाचा मंत्र:-
*होलिके च नमस्तुभ्यं ढुण्ढादेवि विमर्दिनि। सर्वोपद्रव नाशार्थं गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते ॥*
*श्रीढुंढाराक्षस्यै नमः इदं विशेष अर्घ्यं समर्पयामि ।* असे म्हणून तो अर्घ्य अर्पण करावा.
प्रदक्षिणा-नीरांजन करावे.
🟣 एक पेलाभर दुधात चमचाभर तूप टाकून ; ते होळीवर प्रोक्षण करावे.
🟣ढुंढा राक्षसी प्रसन्न होण्याकरिता :- *देश भाषया भग-लिंग आदी शब्द उच्चारण पूर्वं सर्वैः सह करपृष्ठ ओष्ठ संयोगेन उच्चैः घोषं कृत्वा त्रिः परिक्रम्य*
नीट शब्द वाचून, अर्थ जाणून; 😃 *ती क्रिया करत*; तीन प्रदक्षिणा कराव्या.
🟣 *नमस्ते सर्व कल्याणि नमस्ते करुणालये । नमस्ते होलिके देवि रुद्रस्य प्रियवादिनी ॥*
या मंत्राने नमस्कार करून; पुष्पांजली वहावी.
🟣 *आयुर्देहि यशोदेहि शिशूनां कुरु रक्षणम् । शत्रवश्च क्षयं यान्तु होलिके पूजिता मया ॥*
या मंत्राने प्रार्थना करावी.
🟣 जर आपल्याकडे कीटक,विंचू,खेकडा ,ढेकूण, उवा इत्यादींचा उपद्रव होत असेल तर; ज्याचा उपद्रव होत आहे तो ; गुळाचा कीटक तयार करून पुढील मंत्राने होळी मध्ये टाकावा.
असे शास्त्रवचन आहे.
मंत्र :- *गुडोद्भवान् वृश्चिकांस्तु गृहाण परमेश्वरी । वृश्चिक उत्थान मे बाधा भवतु त्वत् प्रसादतः ॥*
असे म्हणून *गुळाचे* तयार केलेले ते *कीटक* होळीमध्ये टाकावे.
🟣 *होलिके होल तनये पूजां स्वीकृत्य मत् कृतां । स्वस्थानं गच्छ भद्रेत्वं रक्षमां अग्निजात् भयात् ॥*
या मंत्राने होळीवर अक्षदा टाकून; विसर्जन करावे.
🟣 *अनेन यथाज्ञानेन कृत पूजनेन श्रीढुंढाराक्षसी प्रीयतां नमम..*
तत्सत् कृष्णार्पणमस्तु..!
असे म्हणून पाणी सोडावे.
श्रीविष्णुंचे त्रिवार स्मरण करावे.
🟣 ब्राह्मण-सुवासिनी भोजन घालावे. भूयसी द्यावी. या रात्री सर्वांनी गायन, उत्सव आदी करून जागरण करावे.
इति पूजा पद्धती….
_____________________
🟣 *!! धुलिवंदन !!*
दुसरे दिवशी; *शारिरीक* आणि *मानसिक* रोगांचा नाश होण्यासाठी *अंत्यज बांधवांना* स्पर्श करून; स्नान करावे.
“नित्यकर्म” झाल्यावर ; पाण्यात थोडेसे दूध टाकून; पुढील मंत्राने ते पाणी होळीच्या राखेवर टाकावे.
मंत्र :- *वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शड़्करेण च । अतस्त्वं पाहि नो देवि विभूते भूतिदा भव ॥*
🟣 हातावर होळी चे भस्म घेऊन ; *देहातील सर्व रोगांचा नाश आणि दुःखांची शांती होण्यासाठी;* पुढील मंत्राने ते भस्म शरीराला लावावे.
मंत्र:- *होलिका देह संभूत सर्व भीति विनाशन । मदीय देहजान् रोगान् भस्म नाशय नाशय ॥*
*वसन्तारंभ संभूते सुराऽसुर नमस्कृते । संवत्सरकृतं पापं क्षमस्व मम होलिके ॥*
असे म्हणून हातातील सर्व भस्म सर्वांगाला लावावे.
माध्यान्ही पुन्हा स्नान करावे.
🟣 या प्रतिपदेस (धुलिवंदनाचे दिवशी) आंब्याचा मोहर चंदनासह वाटून प्राशन करणारा व्यक्ती; वर्षपर्यंत सुखी होतो.
(पुराणसमुच्चय)
🟣 आम्रकुसुम प्राशन मंत्र:-
*चूतमग्र्यं वसन्तस्य माकंद कुसुमं तव । सचंदनं पिबामि अद्य सर्व कामार्थ सिद्धये ॥*
🟣 *होलिकाड़्गारपक्वान्नं रोजी भक्षयति तद्दिने ।*
*यावत् संवत्सरं पूर्ण क्लेशमान्नभवेद्धि सः ॥*
अर्थ..
होळीच्या अग्नीवर शिजविलेले अन्न होळीपौर्णिमेस भक्षण केल्यास; एक वर्ष पर्यंत क्लेश, दु:ख होत नाही.
(ज्योतिषग्रंथ)
इति… होलिका पूजा पद्धती धुलिवंदनं च..
🟣 *उपरोक्त ही आणि अशाप्रकारचे सर्व सण आणि धर्मकार्ये आपल्या वेदपाठशाळेत दरवर्षी केली जातात.* _____________________
🟣 फाल्गुन पौर्णिमेला पुरुषोत्तम जो गोविंद त्याला हिंदुळ्यामध्ये ( झोक्यात) बसवून झोंपा काढाव्या. (झोका देणे करावे.)
त्याचे दर्शन घ्यावे.
तेणे करून व्यक्ती ( देहांते) वैकुंठास जातो.
(ब्रह्मपुराण – कृत्यचिंतामणीं)
____________________
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!