• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

।।होळी।।

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
March 13, 2025
in ताज्या बातम्या
0


नमस्कार…!
दि.१३|०२|२०२५
!! होळी पौर्णिमा विशेष माहिती- सविस्तर पूजा, धुलिवंदन पद्धती !!
🟣 फाल्गुन पौर्णिमा ही होलिका होय.
🟣 या दिवशी देशभरात होलिका दहन केले जाते.
तथापि अनेक प्रदेश किंवा गावं अथवा कुळं अशी आहेत; त्यांचेकडे “होलिका दहन” केले जात नाही.
ज्यांचेकडे होलिका दहन केले जाते त्यांचे करिता; ही माहिती देत आहे.
🟣 होळी सायान्ही (संध्याकाळी) प्रदोषकाळी करावी.
(निर्णयामृत & दिवोदासीय & चंद्रप्रकाश & विद्याविनोद)
🟣 होळी दिवसा पेटऊ नये. दिवसा होळी करणेंचा मोठा दोष आहे.
तसेच “भद्रा” (योगावर) देखील पेटऊ नये.
संध्याकाळी “भद्रा” असतील तर; “भद्रामुख” सोडून होलिका दहन करावे.
(ज्योतिर्निबंध-नारद & पुराणसमुच्चय-निर्णयामृत- मदनरत्न)
🟣 श्रावण पौर्णिमेचे “रक्षाबंधन” आणि फाल्गुनातील “होलिकादहन” हे “भद्रा” वर (भद्रा नावाचा एक योग असतो; त्यावर) करूं नये.
(भविष्यपुराण-निर्णयामृत)
🟣 आपल्याकडे बहुतेक लोक दिवसाच होळी करत आहेत; हे चुकीचे आहे.

🟣 या दिवशी (रात्री) ०८.३६ ते रात्री १०.४३ पर्यंत “भद्रामुख” असलेने या वेळेत होळी पेटऊ नये.
(सूर्यसिद्धांतीय पंचांग)
🟣 या वर्षीचा प्रदोषकाळी होलिका दहनाचा मुहूर्त :- सायंकाळी ०६.४१ ते ०८.०६ पर्यंत होळी करावी.
(सूर्यसिद्धांतीय पंचांग)
🟣 ज्यांचेकडे विवाह – उपनयनाऽदी मंगल कार्ये झालेली आहेत त्यांनी; मंगलकार्यानंतर सहा महिन्यापर्यंत फक्त होलिका पूजा करावी. त्या नंतरचा विशिष्ट विधी 😃 करूं नये.
असा शिष्टाचार आहे.

🟣 !!अथ होलिका पद्धती !!
अंगण सारवून – रांगोळीने सुशोभित केलेल्या जमिनीवर मध्यभागी “एरंडाची” (न मिळेल तर; अन्य झाडाची) एक फांदी रोऊन तिच्या सभोवताली वर्तुळाकार वाळलेली लाकडे ,गोव-या यांचा ढीग करावा.
ढुंढाराक्षसी प्रसन्न होऊन; तिच्या पासून होणा-या सर्व त्रासापासून सुटका होऊन; सर्व अशुभांचे शमन होण्यासाठी; म्हणून संकल्प पूर्वक- सोळा उपचारांनी पूजा करावी. पुरणपोळी, फळं, नारळं अर्पण करावी. गंधाक्षतपुष्पाने अर्घ्यदान करावे. प्रदक्षिणा- प्रार्थना करावी. ब्राह्मण-सुवासिनी भोजन घालावे. दक्षिणा देऊन संतुष्ट करावे.
गावाची होळी ग्रामप्रमुखाने पेटवावी.
🟣 !! प्रत्यक्ष पूजा पद्धती !! :-
वरती सांगितल्याप्रमाणे होळी रचून- सर्व पूजा साहित्य घेऊन , हातात पाणी घेऊन देशकालादींचा उच्चार करून पुढील संकल्प करावा …
मम सपरिवारस्य श्रीढुंढाराक्षसी प्रीतिद्वारा तत् कर्तृक विविध बालजन उपसर्ग अग्निबाधा उत्पात् भय प्रशमन पूर्वकं क्षेमायुः पुष्टिमय ऐश्वर्य सुख संपत् कुलअभिवृद्धी आदी अभीष्ट फल सिद्धिकामः श्रीहोलिका पूजनं करिष्ये ।
असा संकल्प करून; रचलेल्या त्या होळीवर “अपवित्रत्व” जाण्यासाठी पळीभर पाणी प्रोक्षण करावे.
शक्य होईल तर; चांडाळ अथवा बाळंतिणीच्या घरातील अग्नीने अथवा अन्य लौकिक अग्नीने होलीका प्रदीपन करावे.
( शक्यतो दोन-तीन गोव-या आधी पुढे घेऊन ; तेव्हढ्याच पेटवून संपूर्ण पूजा करावी. म्हणजे सर्व होळी पेटवून जर मोठ्या ज्वाळा झाल्यातर ;पूजा नीट करता येणार नाही. )
🟣 होलिका पेटविण्याचा मंत्र:- दीपयामि अद्यते घोरां चितिं राक्षससत्तमे । हिताय सर्व जगतां प्रीतये पार्वतीपतेः ॥
या मंत्राने होलिका पेटवून पुढील मंत्राने ध्यान करावे.
🟣 होळीच्या ध्यानाचा मंत्र :- सप्त हस्तां चतुःशृंगीं सप्त जिव्हां द्वि शीर्षकां । त्रिपदां हृष्ट वदनां सुखासीनां शुचिस्मितां ॥
मेषारूढां अग्निरूपां जिव्हाललन भीषणां । तप्तकांचन संकाशां होलीकां हृदि चिंतये ॥
अशाप्रकारे ध्यान करून; पुढील मंत्राने पूजा करावी.
🟣 पूजा मंत्र :- अस्माभिः भय संत्रस्तैः कृतात्वं होलिके यतः। अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव ॥
या मंत्राने सोळा उपचारांनी पूजा करावी.
पुरणपोळी चा नैवेद्य होळी मध्ये ठेवावा. नारळ , फळं अर्पण करावी.
त्या नंतर पळीभर पाणी घेऊन त्यात गंधाक्षतपुष्प फलदक्षिणा घेऊन पुढील मंत्राने अर्घ्यदान करावे..
🟣 अर्घ्यदानाचा मंत्र:-
होलिके च नमस्तुभ्यं ढुण्ढादेवि विमर्दिनि। सर्वोपद्रव नाशार्थं गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते ॥
श्रीढुंढाराक्षस्यै नमः इदं विशेष अर्घ्यं समर्पयामि । असे म्हणून तो अर्घ्य अर्पण करावा.
प्रदक्षिणा-नीरांजन करावे.
🟣 एक पेलाभर दुधात चमचाभर तूप टाकून ; ते होळीवर प्रोक्षण करावे.
🟣ढुंढा राक्षसी प्रसन्न होण्याकरिता :- देश भाषया भग-लिंग आदी शब्द उच्चारण पूर्वं सर्वैः सह करपृष्ठ ओष्ठ संयोगेन उच्चैः घोषं कृत्वा त्रिः परिक्रम्य
नीट शब्द वाचून, अर्थ जाणून; 😃 ती क्रिया करत; तीन प्रदक्षिणा कराव्या.
🟣 नमस्ते सर्व कल्याणि नमस्ते करुणालये । नमस्ते होलिके देवि रुद्रस्य प्रियवादिनी ॥
या मंत्राने नमस्कार करून; पुष्पांजली वहावी.
🟣 आयुर्देहि यशोदेहि शिशूनां कुरु रक्षणम् । शत्रवश्च क्षयं यान्तु होलिके पूजिता मया ॥
या मंत्राने प्रार्थना करावी.


🟣 जर आपल्याकडे कीटक,विंचू,खेकडा ,ढेकूण, उवा इत्यादींचा उपद्रव होत असेल तर; ज्याचा उपद्रव होत आहे तो ; गुळाचा कीटक तयार करून पुढील मंत्राने होळी मध्ये टाकावा.
असे शास्त्रवचन आहे.
मंत्र :- गुडोद्भवान् वृश्चिकांस्तु गृहाण परमेश्वरी । वृश्चिक उत्थान मे बाधा भवतु त्वत् प्रसादतः ॥
असे म्हणून गुळाचे तयार केलेले ते कीटक होळीमध्ये टाकावे.
🟣 होलिके होल तनये पूजां स्वीकृत्य मत् कृतां । स्वस्थानं गच्छ भद्रेत्वं रक्षमां अग्निजात् भयात् ॥
या मंत्राने होळीवर अक्षदा टाकून; विसर्जन करावे.
🟣 अनेन यथाज्ञानेन कृत पूजनेन श्रीढुंढाराक्षसी प्रीयतां नमम..
तत्सत् कृष्णार्पणमस्तु..!
असे म्हणून पाणी सोडावे.
श्रीविष्णुंचे त्रिवार स्मरण करावे.
🟣 ब्राह्मण-सुवासिनी भोजन घालावे. भूयसी द्यावी. या रात्री सर्वांनी गायन, उत्सव आदी करून जागरण करावे.
इति पूजा पद्धती….

🟣 !! धुलिवंदन !!
दुसरे दिवशी; शारिरीक आणि मानसिक रोगांचा नाश होण्यासाठी अंत्यज बांधवांना स्पर्श करून; स्नान करावे.
“नित्यकर्म” झाल्यावर ; पाण्यात थोडेसे दूध टाकून; पुढील मंत्राने ते पाणी होळीच्या राखेवर टाकावे.
मंत्र :- वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शड़्करेण च । अतस्त्वं पाहि नो देवि विभूते भूतिदा भव ॥
🟣 हातावर होळी चे भस्म घेऊन ; देहातील सर्व रोगांचा नाश आणि दुःखांची शांती होण्यासाठी; पुढील मंत्राने ते भस्म शरीराला लावावे.
मंत्र:- होलिका देह संभूत सर्व भीति विनाशन । मदीय देहजान् रोगान् भस्म नाशय नाशय ॥
वसन्तारंभ संभूते सुराऽसुर नमस्कृते । संवत्सरकृतं पापं क्षमस्व मम होलिके ॥
असे म्हणून हातातील सर्व भस्म सर्वांगाला लावावे.
माध्यान्ही पुन्हा स्नान करावे.
🟣 या प्रतिपदेस (धुलिवंदनाचे दिवशी) आंब्याचा मोहर चंदनासह वाटून प्राशन करणारा व्यक्ती; वर्षपर्यंत सुखी होतो.
(पुराणसमुच्चय)
🟣 आम्रकुसुम प्राशन मंत्र:-
चूतमग्र्यं वसन्तस्य माकंद कुसुमं तव । सचंदनं पिबामि अद्य सर्व कामार्थ सिद्धये ॥
🟣 होलिकाड़्गारपक्वान्नं रोजी भक्षयति तद्दिने ।
यावत् संवत्सरं पूर्ण क्लेशमान्नभवेद्धि सः ॥
अर्थ..
होळीच्या अग्नीवर शिजविलेले अन्न होळीपौर्णिमेस भक्षण केल्यास; एक वर्ष पर्यंत क्लेश, दु:ख होत नाही.
(ज्योतिषग्रंथ)
इति… होलिका पूजा पद्धती धुलिवंदनं च..
🟣 उपरोक्त ही आणि अशाप्रकारचे सर्व सण आणि धर्मकार्ये आपल्या वेदपाठशाळेत दरवर्षी केली जातात. _________
🟣 फाल्गुन पौर्णिमेला पुरुषोत्तम जो गोविंद त्याला हिंदुळ्यामध्ये ( झोक्यात) बसवून झोंपा काढाव्या. (झोका देणे करावे.)
त्याचे दर्शन घ्यावे.
तेणे करून व्यक्ती ( देहांते) वैकुंठास जातो.
(ब्रह्मपुराण – कृत्यचिंतामणीं)

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!

Previous Post

पाच वर्षांत बीडचा बारामतीसारखा विकास होईल -आ.संदीप क्षीरसागरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले.

Next Post

।।होळी।।

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

।।होळी।।

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.