• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सावरकर महाविद्यालयाला केंद्र सरकारचे पाठबळ मंगळवारी भुमीपूजन सोहळा

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
March 10, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, शैक्षणिक
0

बीड(प्रमोद कुलकर्णी) पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियान (पीएम उषा) या योजनेतून विविध विषयांमधील शिक्षण आणि संशोधनाद्वारे विद्यापीठ, महाविद्यालयांना मजबूत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात ज्ञान प्रणाली आणि कौशल्य विकास अधिक गतीने होण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून भरीव निधी प्राप्त करून दिला जातो आहे.


बीड येथील स्वा. सावरकर महाविद्यालय 1995 ला सुरू झालेले आहे, अवघ्या तीन दशकाच्या काळात शिक्षण क्षेत्रातील चढता आलेख लक्षात घेता, 55 विद्यार्थी आणि 5 प्राध्यापकापासून सुरू झालेले हे वरिष्ठ महाविद्यालय आज स्वतःच्या दिमाखदार वास्तूत ताठमानाने उभे झालेले दिसून येत आहे. भौतिक विकासासोबतच सर्व ज्ञान प्रणालीच्या शाखांचा विस्तार मोठा होता गेलेला आहे. शिक्षणातील भारतीयत्व आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता कला शाखेला इतर पारंपारिक विषयांबरोबरच संस्कृत, तत्त्वज्ञान, संगीत नाट्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल ,गृहशास्त्र अशा विविध विषयांची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते आहे. विज्ञान शाखेत जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संख्याशास्त्र अशा विविध विषयाच्या सोयी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असलेले व्यवसाभिमुख अभ्यासक्रम विविध कौशल्य विकासाचे कोर्सेससाठीचा विभाग कार्यरत आहे. महाविद्यालयाचे संगणकीकरण ,अद्यावत सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेट सेवा, प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी सर्वांसाठीच गुणवत्तापूर्ण तांत्रिक व्यवस्था ,सोई सुविधा पुरेपूर असलेले महाविद्यालय.या सावरकर महाविद्यालयात ज्ञानोपासक,कलोपासक, विद्यार्थी कल्याण मंडळासह, राष्ट्रीय सेवा योजना, विस्तार सेवा विभाग, विज्ञान मंडळ अशा विविध मंडळ, समित्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
भित्तीपत्रके,” कौस्तुभ “वार्षिक अंक, महापुरुषांची जयंती -पुण्यतिथी, विविध प्रदर्शनी, कार्यशाळा ,शिबिरे, लोक जागरण आरोग्य शिबीर,स्पर्धा, देशभक्तीपर आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन सातत्याने इथे सुरू असते. दरवर्षी विविध पातळीवर पारितोषिके पटकवणारी विद्यार्थी हे महाविद्यालयाची पावती आहे. खेळ ,गायन, वक्तृत्व स्पर्धा, कलोपासना, युवक महोत्सवात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आणि घवघवीत यश मिळवणे. आज गीत गायन सर्व स्पर्धेत” वेद मुळे” हा विद्यार्थी जसा सर्वत्र चमकतो आहे तसाच तबलावादनात ‘नरहरी दळे’ हा देखील राज्यभर नावलौकिक मिळवणारा सावरकरचा विद्यार्थीच आहे.
सर्व चढत्या आलेखानुसार महाविद्यालयातस नॅक मूल्यांकनात “बी प्लस प्लस” हा खूप मोठा छान दर्जा प्राप्त झालेला आहे. विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता आलेख चढताच असतो, तीच उज्वल परंपरा कायम ठेवलेली आहे.
महाविद्यालयातील अध्यापनाबरोबरच प्राध्यापक शिक्षक आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करतच असतात. 99 टक्के अधिव्याख्याता हे विद्यावाचस्पती आहेत. महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापक विविध सर्वेक्षणावर आधारित शोधनिबंध तयार करून विविध ठिकाणच्या परिसंवादातून सादर करत असतात. कल्पकता आणि संशोधक वृत्ती जोपासना,मायक्रोबायलाॅजीत प्रा.डाॅ कृष्णा बारटक्के याचं पेटेन्ट रजिस्टर होणं हा बहुमान महाविद्यालयाचा आहे.अभ्यासपूर्ण व्याख्याने येथे आयोजित केली जातात. शासन आणि विविध संस्थांकडून प्राध्यापक विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते आहे. शिक्षक पालक योजना हे एक महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विद्यार्थी आपला “पाल्य” समजून त्याच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन सातत्याने संपर्कात राहत, फीडबॅक घेतल्याने माजी विद्यार्थी संघटन देखील तयार झालेले आहे. समाजातील विविध क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असणारे सर्व माजी विद्यार्थी ही एक जमेची बाजू म्हणावी लागते .जागतिक आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्यवान असा विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडावा अशी कर्तव्य आणि मानस महाविद्यालयात कार्यरत सर्वांचंच आहे.
महाविद्यालय स्थापनेच्या प्रतिकूल काळात प्रा. सतीश पत्की, डॉ. सुरेखाताई देशमुख , दिनकरराव वझे ,सत्यनारायणाची लोहिया, पद्माकरराव देशपांडे, डॉ जी.एम. कुलकर्णी अशा मान्यवरांचे योगदान मौलिक आहे. आजचे भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलुरकर, कार्यवाह डॉ हेमंत वैद्य ,प्रा चंद्रकांत मुळे, डॉ .पि .के. कुलकर्णी डॉ. अविनाश देशपांडे अशा अनेक हितचिंतक संस्था पदाधिकारी,सदस्यांचे योगदानही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. प्राचार्य डॉ.सुहास मोराळे, सावरकर भक्त उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर ,वृक्षवल्ली मित्र डॉ.उत्तम साळवे सर सर्वच प्राध्यापक, सहकारी कर्मचारी, यांच्या पाठीवर थाप आणि मोठे आर्थिक पाठबळ केंद्र शासनाच्या या “पीएम उषा” योजनेतून मिळाले आहे, ही पावती आणि आनंदाचा कुलाचार सोहळा परिवारातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे.या स्वा.सावरकर महाविद्यालय तीनदशकपुर्ती सेवा गौरवस शुभेच्छा आहेतच.

Previous Post

विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो.अजित पवारांनी मांडला अर्थसंकल्प

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली;२६मार्च पुढची तारीख

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली;२६मार्च पुढची तारीख

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.