• Contact Us
  • Home
Sunday, August 3, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

।। महाशिवरात्री।।

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 26, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

।। महाशिवरात्री।।

नमस्कार…!

दि.२६|०२|२०२५

*॥ महाशिवरात्री महत्व-  विशेष – संक्षिप्त पूजा पद्धती ॥*

🟣 माघ कृष्ण चतुर्दशी चे ठायी मध्यरात्री (निशीथकाळी) आदिदेव भगवान् कोटिसूर्याप्रमाणे देदीप्यमान असे शिवलिंगरूपाने उत्पन्न (प्रकट) झाले.
(ईशान संहिता)

🟣 या चतुर्दशीला ( महाशिवरात्रीला) जे मनुष्य स्वस्थचित्त होऊन;कृत्तिवासेश्वर शिवलिंगाची पूजा करतात ते उत्तम व रोगरहित अशा सदाशिवस्थानाप्रत जातात.
(हेमाद्री-तीर्थखंड & लिंगपुराण)

🟣 शिवरात्री व्रताहून दुसरें काही अत्यंत श्रेष्ठ नाही.

*या व्रतदिवशी जो प्राणी भक्तीने त्रिभुवनेश्वर रुद्राला पूजित नाही तो या संसारात हजारो जन्मपर्यंत फिरतो यात संशय नाही.*
(स्कंदपुराण- माधवीय)

न केले असता दोष सांगितल्यावरून; पुरुष अथवा स्त्री यांनी दरवर्षी शिवरात्री ला महादेवाची भक्तीने पूजा करावी.
कदाचित समुद्र शुष्क होईल, हिमवान् पर्वतही क्षीण होईल व ते कदाचित्  चलित होतील पण “शिवव्रत” कधीही चलित होणार नाही. या वचनानुसार हे शिवरात्रीव्रत नित्य आहे.
भगवान शिव- पार्वतीला सांगतात; हे देवी! जो माझा भक्त शिवरात्रीचे उपोषण करितो त्याला दिव्य ( उत्कृष्ट) नाशरहित कोठेही शिवाज्ञाभग्न न होणारे असे “गणत्व” (आधिपत्य) प्राप्त होऊन; सारे मोठे भोग भोगून तो मोक्षास जाईल. 
(स्कंदपुराण)

🟣 हे शिवरात्री व्रत बारा अथवा चोवीस वर्ष पर्यंत करावे. 
(ईशान संहिता)

🔸️प्रत्येक मासी कृष्ण चतुर्दशी चे ठायी “शिवव्रत” हे सर्व काम देणारे आहे.
(कालोत्तर- हेमाद्री)

🟣 या शिवरात्री व्रताचे ठायी *जागरण, उपवास, शिवपूजा ही सर्व मिळून व्रत होते. यातून केवळ उपवास , जागरण अथवा पूजा असे एक काही तरी केल्यास व्रत होत नाही.*
हे शिवरात्री व्रत सर्व पापनाश करणारे व आचांडालापर्यंत सर्व मनुष्यांना भुक्ति व मुक्ति देणारे आहे.

जो अखंडित व्रत होत्साता शिवरात्री व्रत करतो तो सर्व मनोरथ पावून शिवासहवर्तमान आनंद पावतो.
(ईशान संहिता)

🟣 हे व्रत कधी आरंभ करावे?  कसें केले असता उपरोक्त फलप्राप्ती कशी  होईल?  याची व्रत ग्रहण पद्धती, पूजा पद्धती, हवन पद्धती व सांगता पद्धती स्वतंत्र व मोठी असलेने विस्तारभयास्तव इथे लिहिणे शक्य नाहिये.

🟣 कोणत्या शिवलिंगाच्या पूजनाने कोणते फळ मिळते  ते सांगतो.

हि-याच्या लिंगाच्या पूजनाने *आयुष्यवृद्धी* होते. येणेप्रमाणे  …. मोत्यांच्या लिंगपूजनाने – *रोगनाश*, वैडूर्य मण्याच्या लिंग पूजनाने- *शत्रुनाश*, माणिक लिंग- *लक्ष्मी प्राप्ती*, पुष्कराज- *सुखप्राप्ती*, नीलमणी- *यश* , पंचरत्न- *पुष्टि*, स्फटिक लिंग- *सर्व मनोरथ प्राप्ती*, रुपे- *राज्य व पितृमुक्ति*, सुवर्णलिंग – *सत्यलोक प्राप्ती*,तांब्याचे- *पुष्टि व आयुष्य*, पितळेचे लिंग- *संतोष*, कांस्य- *कीर्ती*, लोखंड- *शत्रुनाश*, शिसे- *आयुष्यवृद्धी*.

अन्य ग्रंथांच्या मताने..
सुवर्णलिंगाने – *ऋणमुक्ति व स्थिरलक्ष्मी*,गंधाच्या लिंगाने- *सौभाग्य*, हस्तिदंताने –  *सेनेचे आधिपत्य*, तांदूळ इ.धान्याच्या पीठाने- *पुष्टि,सुख,रोगनाश* , उडिदाच्या पीठाचे लिंग- *स्त्रीप्राप्ती*, नवनीताने- *सुखप्राप्ती* , गोमयाने- *रोगनाश*, गुळाच्या लिंगाने- *अन्नप्राप्ती*, वेळूचे अंकुर आणून त्यांचे लिंग करून पूजा केल्यास *वंशवृद्धी* होते.
(धर्मसिंधू)

🟣 *पूजा पद्धती*
या महाशिवरात्री च्या दोन पूजा पद्धती आहेत.

१} निशीथकाळातील (मध्यरात्री ची ) पूजा.

२} शिवरात्री व्रतांगभूत- चार “यामपूजा”  ( ही पूजा खूप मोठी असलेने इथे प्रस्तुत करणें जिकरीचे आहे.)

🟣 यातील पहिली असलेली “निशीथकाळी” ची पूजा पद्धती  (विस्तारभयास्तव) संक्षिप्त रूपाने प्रस्तुत करत आहे…!

🟣 त्रयोदशीला एकभक्त राहून; चतुर्दशीचे दिवशी आन्हीकादी नित्यक्रिया  आटोपून सकाळी देशकालादींचा उच्चार करून पुढील मंत्राने संकल्प करावा.
मंत्र:- *शिवरात्री व्रतंह्येतत् करिष्येहं महाफलम्  ।*
*निर्विघ्नं अस्तुमेचात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते ॥*

*चतुर्दश्यां निराहारो भूत्वाशंभोपरेहनि । भोक्ष्येहंभुक्ति मुक्त्यर्थं शरणंमे भवेश्वर ॥*

असे म्हणून हातावरून  पाणी सोडून संकल्प करावा.

🟣सायंकाळी ; काळेतीळ टाकलेल्या पाण्याने स्नान करावे.
भस्मत्रिपुंड- रुद्राक्षमाला धारण करून; निशीथकाळी ( या वर्षी चा निशीथकाळ मध्यरात्री १२.२२ ते ०१.११ पर्यंत आहे.) शिवालयात अथवा स्वगृही उत्तरेकडे मुख करून शुद्धाऽसनावर बसून देशकालादींचा उच्चार करून; *श्रीशिव प्रीत्यर्थं शिवरात्रौ श्रीशिवपूजां करिष्ये।* असा संकल्प करून गणेशपूजा, आसनशुद्धी, न्यास आणि कलशपूजा करावी.
पूजासंभारांवर प्रोक्षण करावे. श्रीशिवांचे ध्यान करून “शिवपंचाक्षर” मंत्राने अथवा *”शिवायनमः”* या मंत्राने षोळशोऽपचार पूजा करावी. १०८ शिवनामाने बिल्वार्चन करावे.
पळीभर पाणी घेऊन त्यात  गंधाऽक्षतपुष्पफलदक्षिणा ठेऊन पुढील मंत्राने अर्घ्यदान करावे.

अर्घ्य मंत्र:- *शिवरात्री व्रतंदेव पूजाजपपरायणः।  करोमि विधिवद्दत्तं गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥*

श्रीशिवाय इदमर्घ्यं समर्पयामि !

असे म्हणून अर्घ्य द्यावे.

*नित्यं नैमित्तिकं काम्यं यत्कृतंतु मयाशिव।*
*तत्सर्वं परमेशान मया तुभ्यं समर्पितम् ॥*

असे म्हणून केलेली पूजा परमेश्वराला अर्पण करावी.
यथाशक्ती जप करावा.

शक्य होईल तर; “शिवपंचाक्षर स्तोत्र” अथवा अन्य कोणतेही शिवस्तोत्र पठण करावे.

प्रार्थना मंत्र:-
*यत्किंचित् कुर्महे देव सदासुकृत दुष्कृतम्।*
*तन्मे शिवपदस्थस्य भुंक्ष्व क्षपय शंकर ॥*

*शिवोदाता शिवोभोक्ता शिवःसर्वमिदं जगत्  ।*
*शिवोजयति सर्वत्र यःशिवः सोऽहमेवहि ॥*

अशी प्रार्थना करावी.

देवाच्या हृदयावरील आणि पायावरील एक ( निर्माल्य) फूल घेऊन ; ते देवानेच दिलेले आहे अशी भावना करून; प्रणाम करावा.
*प्रपन्नं पाहिमामीश भीतंमृत्यु महार्णवात्*
असे म्हणून देवाला हात जोडावे, साष्टांग नमस्कार करावा.

अनेन पूजनेन सांबसदाशिवः प्रीयतां नमम…

असे म्हणून सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करावे.
श्रीविष्णुंचे त्रिवार स्मरण करावे..!

इति संक्षिप्त महाशिवरात्री व्रत पद्धती..!🙏

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त..!

Previous Post

नाट्यगृहाचे ऑडिट आणि दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी गणेश ढवळे यांचे आंदोलन

Next Post

नाशिकच्या कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार – फडणवीस

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

नाशिकच्या कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार - फडणवीस

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.