• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसृष्टी’ हे प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 19, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राज्य
0

पुणे (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंबेगाव, पुणे येथे ‘शिवसृष्टी’च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून, साकार झालेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली. आजचा दिवस अत्यंत धन्य अशा प्रकारचा असून या शिवसृष्टीचे सुंदर कार्य बघून निःशब्द झालो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

या शिवसृष्टीमध्ये साकारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराची भव्यता, गंगासागर तलाव आणि स्वदेश, स्वधर्म व स्वभाषेच्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेगवेगळ्या देशातून आणलेले अतिशय दुर्मिळ छायाचित्र, याच त्रिसूत्रीवर आधारित ‘360 डिग्री प्रकारची टाईम मशीन’ आणि या टाईम मशीनमुळे मिळालेली प्रेरणा व तयार झालेली भावना अवर्णनीय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाचे व प्रेरणादायी प्रसंग या शिवसृष्टीमध्ये मांडण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक म्हणून आपण या शिवसृष्टीकडे पाहू शकतो. स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील आज स्वर्गातून शिवाशीर्वाद देत असतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही शिवसृष्टी प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या ‘योग्या’प्रमाणे स्वराज्यासाठी लढले. ही शिवसृष्टी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसृष्टीचे काम हे राष्ट्रकार्य असून ते अधिक वेगाने व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ₹50 कोटींच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. विजय शिवतारे, शिवसृष्टीचे विश्वस्त व अध्यक्ष जगदीश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन होणार.

Next Post

जल्लोष शिवजयंतीचा! बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जल्लोष शिवजयंतीचा! बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.