• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन होणार.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 18, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राज्य
0


मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ही बैठक वादळी झाल्याचं समजतेय.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी मत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले सहा महत्त्वाचे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे. फडणवीस सरकारकडून आज वादळी निर्णय घेण्याची शक्यता होती, डान्स बारच्या कायद्यात बदल करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता होती, पण तसा कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला नाही.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय


म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

Previous Post

संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

Next Post

शिवसृष्टी’ हे प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

शिवसृष्टी' हे प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.