बीड दि.01 (प्रतिनिधी)ः- काकू नाना प्रतिष्ठान आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विचार मंचच्या वतीने सुरू असलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रम घराघरात पोहचला आहे, प्रत्येक प्रभागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत मोकळा स्वास घेऊ लागल्या आहेत, त्यांचा हा आंनद बघून समाधान होत आहे, यंदा फक्त जयदत्त आण्णाचं आशा प्रतिक्रिया महिला भगिनी व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन महिला आघाडी प्रमुख जयश्री विधाते यांनी केलेे. त्या काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी 2024खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16 विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंपावती नगर, बार्शी रोड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सौ.कुसुमताई क्षीरसागर, सौ.मेघा राजेश मचाले, सौ.निलावती तुकाराम शेरकर, सौ.प्रमिला अर्जुन जाधव, सौ.सुमन बडगे, सौ.शकुंतला गंडाळ, सौ.दिपाली नाळपे, सौ.कच्ची मॅडम, सौ.अनिता डोंगरे, सौ.उषाताई सरवदे, सौ.इंदरबाई मुळूक, सौ.पालशिंगणकरताई, सौ.जाधवताई आदी मान्यवर महिलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना जयश्री ताई म्हणाल्या की बीड जिल्ह्यात आता एकमेव अभ्यासू नेता जर कोण असेल तर ते जयदत्त आण्णा आहेत, प्रत्येकाला आपली सुरक्षितता महत्वाची असते, म्हणून आपल्याला आपली सुरक्षितता हवी असेल तर आण्णांच्या हाती आपले पालकत्व देण्याची गरज आहे, जनतेने प्रत्येकाला संधी दिली आहे पण त्या संधीच सोन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी करणारे निघाले हे जनताही आता मान्य करू लागली आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या नेत्यांचे वजन आहे, विकासाचे कसब आहे अशा माणसाला निवडून दिले तरच विकासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन आलो जो तो म्हणतो क्षीरसागरच हवे पण जयदत्त आण्णा हवे, या बोलक्या प्रतिक्रिया सांगून जातात की, यावेळी जनतेनेच ठरवले आहे की, आता शांत संयमी आणि विकासाची जाण असलेला आपला हक्काचा माणूस म्हणून आण्णांना निवडून द्यायचे आहे. होम मिनिस्टर हे निमित्त झाले पण या माध्यमातून लोकांच्या, महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया यंदा आण्णाला गुलाल लावणार आहेत.
विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी काहीही उपयोग होणार नाही. कारण आण्णासारखा नेता नुसता आमदार नव्हे तर मंत्री म्हणून विधानसभेत जाऊ शकतो ही लोक भावना वाढू लागली आहे. असे सांगून त्यांनी आण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सर्वप्रथम येऊन पैठणी जिंकण्याचा मान सौ.उषा अविनाश चाटे यांना मिळाला तर इमिटेशन ज्वेलरीच्या मानकरी सौ.मंगल रविंद्र संकपाळे तर चौरंगाच्या मानकरी सौ.वैषाली देवेंद्र शेवाळे या ठरल्या उर्वरित सात महिलांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. सौ.मनिषा दशरथ झांबरे, सौ.गितांजली प्रदिप गोरे, सौ.वैष्णवी माधव बोईनवाड, सौ.मनीषा शाहूराव शिंदे, सौ.डॉ.शितल महारुद्र क्षीरसागर, सौ.छाया अरुण तांबडे, सौ.वंदना किसन भोसले यांना मिळाले. विनोदाला अध्यात्माची झालर देऊन प्रसंगावधान राखून बहारदार सूत्रसंचालन करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुरेश भाऊजी उर्फ सुरेश साळुंखे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, कार्यकर्त्या यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास आबाल वृद्ध महिलांची तुफान गर्दी झाली होती.