
बीड(प्रतिनिधी) भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.येत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस विविध विभागाचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ संस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
उद्या अजित पवार बीड दौऱ्यावर-

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे देखील असणार सोबत असणार आहे. अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच विमानाने संभाजीनगरला पोहचणार आहेत. तसेच उद्या (30 जानेवारी) बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांसह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बीडच्या डीपीडीसी बैठकीत मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सुरेश धसांच्या मागण्या..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 तारखेला आष्टीत येत आहेत असं सुरेश धस म्हणाले. बीड जिल्ह्यातील पोलीसांच्या बदल्या करा. तेथील पोलीसांची मटक्यावाल्यासोबत अर्धी पार्टनरशिप आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला. काही पोलीस एकाच एका ठिकाणी 20- 20 वर्ष आहेत. याची माहिती मी मुख्यमंत्र्याना दिलीय. परळीतील अवैध राखेचे साठे आहेत याची यादी माझ्याकडे आहे, मी पोलीसांना देणार आहे. महादेव गित्ते हे मागचं प्रकरण आहे, वाल्मिक अण्णा हा एकच आहे. मागे दुसरा वाल्मिक अण्णा पोलीसांना दाखवला आहे.वाल्मिक अण्णा हा एकच आका आहे, आकाचा आका दुसरा आहे. कोण त्या महिल्या अधिकारी आहे, ज्यांना वाल्मिक अण्णांनी फोन केला होतो, याचा मिडीयाने तपास करावं. कृष्णा आंधळेच्या बाबतीत मी पोलीसांकडून माहिती घेतली. तो गरिब आहे, मात्र त्यावर अनेक गुन्हे आहेत. सौरभ भोंडवे नावाचा मुलगा आहे, त्याचे वडील माझ्याकडे आले होते, अशी माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. दरम्यान, एका रस्त्याच्या कामासाठी 5-5 वेळा पैसे उचलले आहेत. परळीत रस्त्याची काम नाहीत. मात्र कोट्यावधी रुपये उचलली आहेत, असा दावाही सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केला.