
बीड (प्रतिनिधी) श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथील पादुका प्रचार व दौराभिक्षा फेरी, जन्मस्थान जांब समर्थ येथून अंबानगरी मार्गे सज्जनगड जाताना बीड शहरात आज शुक्रवार २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
ही भिक्षा फेरी व प्रचार दौरा ३१ जानेवारी दुपारी बारापर्यंत चालणार आहे. आज शुक्रवार २४ जानेवारी रोजी सहयोग नगर मधील सर्वेश्वर गणेश मंदिरापासून सुभाष रोड मार्गे थोरले पाटांगणापर्यंत पादुकांची आज भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे,

यावेळी ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर, श्री भूषण स्वामी अध्यक्ष सज्जनगड संस्थान , समर्थांच्या घराण्यातील अकरावे वंशज,मान्यवर, लोकप्रतिनिधीची, नागरिक बंधू भगिनीचीं विविध ठिकाणी स्वागताला उपस्थिती असणार आहे.
दिनांक 25 ते 31 जानेवारी सकाळी आठ ते दुपारी बारा यावेळी शहराच्या विविध भागात भिक्षा फेरीचा कार्यक्रम होईल. पाटांगणावर मुक्कामी असलेल्या पादुका ठिकाणी दररोज सकाळी काकड आरती, अभिषेक व आरती आठ ते बारा पर्यंत भिक्षा फेरी, सायंकाळी सांप्रदायिक नित्य उपासना , किर्तन सेवा, शेजारती होईल. सर्व भाविक भक्तांनी, समर्थ सेवेकर, नागरिक बंधू-भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन संपादक दिलीपराव खिस्ती विनायक महाराज पाटांगणकर ,प्रा.डाॅ. दीपक देशमुख, समर्थ भक्त कृष्णा महाराज रामदासी यांनी केले आहे.