• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संत तुकाराममहाराज आणि संत नामदेवांचा वारसा पुढे नेणाऱ्या संत तुकाविप्र यांची आज पुण्यतिथी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 23, 2025
in सांस्कृतिक
0

संत तुकाविप्र यांचा परिचय

मूळ नाव तुकाराम भगवंत विपट

जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १६५० – अंजनवती – जिल्हा बीड

समाधी – पौंष कृष्ण चतुर्दशी शके १७१४ – अंजनवती – जिल्हा – बीड
संप्रदाय वारकरी संप्रदाय
गुरू नाथवंशीय विप्रनाथ स्वामी

शिष्य पांडुरंग तथा बापुसाहेब विप्र – पूर्वाश्रमीचे पुरंदरे

भाषा मराठी

साहित्यरचना भागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीका,शतकोटीचे अभंग, तत्त्वमसि,सुदामचरित्र. भानुदास चरित्र , कालियामर्दन, पंढरीपर अभंग, नरदेह महिमा अभंग, इतर संतावरचे अभंग,

विठ्ठलावरील पोवाडा, अनेक पदे आरत्या[५]
कार्य जनजागृती, समाजसुधारक, कवी, कीर्तनकार[६]
संबंधित तीर्थक्षेत्रे अंजनवती, ब्रम्हपुरी, बोरबन, पंढरपूर[१]
वडील भगवंतराव विपट
आई चिन्माई – नाथ वंशीय विप्रनाथ यांची कन्या [५]
पत्नी सगुणा

पेशवेकालीन संत – संत तुकाविप्र (Saint Tukavipra) हे सन्त एकनाथ महाराजाच्या शिष्य परम्परेतील एक महान सत्पुरुष होते

संत तुकाविप्र यांचा काळ हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन 1728 ते इसवी सन 1792 हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. संत तुकाविप्र हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते. संत तुकाविप्र हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. संत तुकाविप्र हे जन्माने ब्राम्हण होते त्यामुळे त्या समाजात असलेल्या काही ठराविक परंपरांचेच पालन करत असत. संत हे नेहमीच परंपरेचा धागा न सोडता आणि त्यात न अडकता वाटचाल करत असतात. म्हणूनच जास्त कर्मकांड करणे हे संत तुकाविप्र यांच्या दिनक्रमांचा भाग नव्हता. स्वतःच्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणांना जेवण देण्याऐवजी गरजू ब्राम्हणेतर लोकांना अन्नदान करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांची थोर मातृवंश आणि गुरू परंपरा लाभलेल्या संत तुकाविप्र यांनी देखील कधीही कर्मकांडांचा प्रचार वा प्रसारही केला नाही. वेदांचा अभ्यास करून त्यातील मर्म हे वेद बोलती सकळा | भाव धरा येक भोळा या सोप्या शब्दात मांडले.

संत नामदेव व संत तुकाराम यांनी जगाची उपेक्षा न करता त्याच जगात वावरत जन सामान्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. अश्या महान संतांचे कार्य पुढे चालवणे या साठी आपला जन्म आहे असे आपल्या अभंगातून संत तुकाविप्र यांनी व्यक्त केले आहे. संत तुकाविप्र यांनी योग विद्येचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्या मार्गाने जाण्याऐवजी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांच्याठायी पक्के होते.

संत तुकाविप्र यांचे साहित्य अद्यापही म्हणावे तेवढे समाजात पोहोचले नाही. संत साहित्याच्या अभ्यासकांनी, समाज-प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार यांनी या संत साहित्याला समाजाभिमुख करण्यासाठी आपापल्या परीने कार्य करायला हवे असे वाटते .

10 संत तुकाविप्र यांचे देवस्थान व मठ [११]
संपादन
संत तुकाविप्र आणि त्यांचे शिष्य पांडुरंग तथा बापूसाहेब विप्र यांनी ज्या मठांची स्थापना केली त्याची माहिती या प्रमाणे

अंजनवती मठ
अंजनवती मठ
अंजनवती – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र व त्यांचे गुरू विप्रनाथ स्वामी यांची समाधी आहे. येथे एकमुखी दत्त मूर्ती देखील आहे

गोंदी – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन केलेली विठ्ठल मूर्ति आहे.

बोरबन – जिल्हा सातारा – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन केलेली गणेश मूर्ती आहे याच बरोबर विठ्ठल मूर्ति आहे

ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन विठ्ठल रखुमाई यांची मूर्ति आहे

पंढरपूर – जिल्हा सोलापूर – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र यांचे शिष्य बापुसाहेब विप्र यांनी स्थापन केलेली एक मुखी दत्त मूर्ती आहे. याच बरोबर येथे बापूसाहेब विप्र यांची समाधी आहे

संत तुकाविप्र अभंगांचे अवलोकन केले असतं हे लक्षात येते की अशा परिस्थितीत संत तुकाविप्र यांनी स्वतः जातीने ब्राम्हण असूनही केवळ ज्ञानाची पूर्ण जाणीव असल्याने या सर्व बाबींना आपल्या कीर्तनांद्वारे वाचा फोडली. एवढेच नाही तर या कर्मकांडांशीवाय मोक्ष देणारा मार्ग म्हणजे भक्ति मार्ग हे पूर्वापार चालत आलेले सत्य परत एकदा लोकांच्या मनात कीर्तन या सर्व सामान्य लोकांना भावणाऱ्या आणि पटणाऱ्या माध्यमातून रुजवले.

मराठी विश्वकोशाच्या इतिहास या section मधील भारतीय इतिहास या sub section मधील मराठा अंमल या प्रकरणात संत तुकाविप्र यांचा उल्लेख – बोरबनचे तुकाविप्र यांनी समाजात आपल्या कवनांद्वारे जागृती केली असा आहे.

संत तुकाविप्र यांच्या जनजागृतीच्या कार्याचा ओझरता उल्लेख सातारा गॅझेट मधील संस्कृति व साहित्य विभागात आढळतो

संत तुकाविप्र यांना गुरू मानणारे लोक अनेक ठिकाणी असणार हे त्यांच्या महाराष्ट्रभर जनजागरणांसाठी केलेल्या भ्रमंतीतून जाणवते. अनेक सरदार हे त्यांचे शिष्य होते यांचा उल्लेख मराठी वाङ्मय कोशात आहे. संत तुकाविप्र यांनी असिधारा वृत स्वीकारले होते म्हणून त्यांना संतती नव्हती. सासवड येथील सरदार बाबुराव पुरंदरे यांना संत तुकाविप्र यांच्या कृपा आशीर्वादाने संतती झाली होती त्यातील मोठा मुलगा म्हणजे पांडुरंग हा संत वय वर्षे 10 पासून संत तुकाविप्र यांच्या सेवेशी होता. तोच त्यांचा परमशिष्य होता. ते पुढे बापूसाहेब या नावाने ओळखले जात. संत तुकाविप्र यांच्या सेवेशी असल्याने पांडुरंग आपले नाव पांडुरंग पुरंदरे न लावता पांडुरंग गुरू तुकाविप्र असे लावायचे. संत तुकाविप्र यांचा साहित्यिक व आध्यात्मिक वारसा हे बापूसाहेब विप्र यांचे वंशज जे विप्र या आडनावाने ओळखले जातात हे जतन करत आहेत.

संत तुकाविप्र – समाधी योग या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे संत तुकाविप्र यांनी अंजनवती – जिल्हा – बीड येथे 14 दिवस सतत कीर्तन करत आपला देह पंचतत्त्वात विलीन केला. संत तुकाविप्र यांचा योगविद्येचा अभ्यास होता हे त्यांच्या तत्त्वमसि या ग्रंथाचे अवलोकन करताना लक्षात येते.

Previous Post

वाल्मीक कराडला मध्यरात्री तुरुंगातून आयसीयूमध्ये..

Next Post

अंबाजोगाईकरांच्या नशिबी पुन्हा निराशा; तो निर्णयच झाला नाही..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अंबाजोगाईकरांच्या नशिबी पुन्हा निराशा; तो निर्णयच झाला नाही..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.