• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पुष्पक एक्सप्रेसला अपघात; ७ प्रवासी ठार झाल्याची भीती

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 22, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, ताज्या बातम्या
0

पाचोरा : जळगावनमधून रेल्वे दुर्घटनेची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडलं.दुर्घटनेमध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी रुळावर अत्यंत भयानक असं दृश्य आहे. काही जणांचे शीर धडावेगळी झाली आहे तर काही जणांचे दोन तुकडे झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येत होती. परधारे गावाजवळ पोहोचली असता एका बोगीतून चाकाखालून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आग लागली अशी अफवा पसरली. त्यामुळे लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या. पण त्याचवेळी बंगळुरू एक्स्प्रेस सुसाट वेगात आली. त्यामुळे काही प्रवाशी हे रेल्वेखाली सापडले. त्यामुळे काही प्रवाशांचे शीर धडा वेगळे झाले. तर काही जणांचे दोन तुकडे झाले. काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे, पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ४ .२० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

जळगावच्या माहेजी जवळ पुष्पक एक्स्प्रेस असताना आग लागल्याची अफवा पसरली. कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच डाऊनच्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरून उभे होते तेवढ्यात भुसावळकडे भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस खाली सापडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

नेमकी कशी घडली दुर्घटना

लखनऊहून मुंबईकडे पुष्पक एक्स्प्रेस येत होती. कुणी तरी चेन खेचली. त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेस ही पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या परधारे गावाजवळ उभी होती. त्याचवेळी काही प्रवाशी हे रुळावर येऊन उभे होते. त्यावेळी विरुद्ध दिशेनं कर्नाटक एक्स्प्रेस आली होती. ही गाडी मुंबईहून बंगळुरूकडे चालली होती. कर्नाटक एक्स्प्रेस वेगात होती त्यामुळे तिने प्रवाशांना चिरडून पुढे निघून गेली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या. काही रेल्वे गाड्या या भुसावळ रेल्वे स्थानकावरून मदत पोहोचली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील धनराज नीला यांनी दिली.

Previous Post

बीड जिल्ह्यात १५,०० मेगा वॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प;डावोसमध्ये बोलणी.

Next Post

वाल्मीक कराडला मध्यरात्री तुरुंगातून आयसीयूमध्ये..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

वाल्मीक कराडला मध्यरात्री तुरुंगातून आयसीयूमध्ये..

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.