• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड जिल्ह्यात १५,०० मेगा वॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प;डावोसमध्ये बोलणी.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 22, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

डावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे.बीड जिल्ह्यात देखील १५,००० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असणाऱ्या एका ऊर्जाप्रकल्पासाठी शिंडर इलेक्टरीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांची भेट घेऊन जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प उभारणी बाबत चर्चा केली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.
रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले. मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

Previous Post

वाल्मिक कराडचा यापुढचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत..

Next Post

पुष्पक एक्सप्रेसला अपघात; ७ प्रवासी ठार झाल्याची भीती

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

पुष्पक एक्सप्रेसला अपघात; ७ प्रवासी ठार झाल्याची भीती

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.