• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे गरीब मोनालीसाने कुंभमेळा सोडला…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 20, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. कुंभमेळ्यातील एका व्हायरल सुंदरीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणारी एक सुंदर मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सावळा रंग, सोनेरी डोळ्यांची ही सुंदरी खूप व्हायरल होत आहे. या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून ती आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. पण, तिचं हेच सौंदर्य आता तिच्यासाठी अडचणीचं बनलं आहे.

प्रयागराज येथील महाकुंभमेळा 2025 मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी एक तरुणी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. मूळची इंदूरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. यादरम्यानचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. व्हायरल सेन्सेशन असलेली मोनालिसा भोसले हिला तिच्या वडिलांनी विक्रीमध्ये घट झाल्यामुळे घरी पाठवले आहे. मोनालिसा हिला अचानक इंटरनेटवर प्रसिद्धी मिळाली, याचा परिणाम त्यांच्या विक्रीवर झाल्यामुळे तिला तिच्या वडिलांनी घरी माघारी पाठवलं आहे.

मोनालिसावर माघारी परतण्याची वेळ…

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरची मोनालिसा प्रयागराज महाकुंभातून घरी परतली आहे. ती येथे माळा विकण्यासाठी आली होती. माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी त्रासदायक ठरत आहे. निराश होऊन तिच्या वडिलांनी मोनालिसाला इंदूरला माघारी पाठवलं आहे.

सोशल मिडियाच्या अतिरेकामुळे अडचणीत वाढ…

व्हायरल झाल्यानंतरही, मोनालिसा कुंभमेळ्यात हार विकत होती. पण तिच्याभोवती नेहमीच लोकांची गर्दी असायची. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची, इतकंच काय तर तिच्यासोबत व्हिडीओ बनवण्यासाठी अनेक युट्यूबर्स येऊ लागले. त्यामुळे मोनालिसा तिचे काम करू शकली नाही. या काळात, जेव्हा जेव्हा ती हार विकायला जायची तेव्हा ती मास्क आणि सनग्लासेस घालायची जेणेकरून लोक तिला ओळखू नयेत. पण तरीही लोक तिच्यासोबत सेल्फी काढणे आणि व्हिडीओ बनवणे सोडत नव्हते.

मध्यप्रदेशातल्या मोनालिसाचा व्यवसाय म्हणजे वाराणसीतून मटेरियल म्हणजे रुद्राक्ष वगैरे घेऊन त्यांच्या माळा करून विकणे. महाकुंभमध्येसुद्धा ती हेच काम करत होती. एका युट्युबरने तिचा विडिओ काढला आणि ती रातोरात अतिशय सुंदर मुलगी म्हणून प्रसिद्ध झाली. अर्थात ती सुंदर आहेच. मग तिचं सौन्दर्य कॅमेरात टिपायला जनता इतकी आतुर झाली कि, रोज तिचे विडिओ येऊ लागले. आणि तिचे फोटो काढायला गर्दीसुद्ध होऊ लागली. शेवटी साधू महंतांना पुढं येऊन हा असला फालतूपणा बंद करा म्हणावं लागलं. तरीही लोकांना काही चैन पडेना. शेवटी साधू महंतांना तिच्याकडून माळा घेऊन नका असं म्हणावं लागलं. तरीही लोकं काही पिच्छा सोडत नव्हते शेवटी वैतागून ह्या मोनालिसाला कुंभमेळ्याचा निरोप घ्यावा लागला. ती आता कुंभमेळ्यात माळा विकत नाहीये.

Previous Post

बीड शहरात, २४ ते ३१ जानेवारी,श्री समर्थ पादुका प्रचार दौरा भिक्षा फेरी

Next Post

नागरी सुविधांसाठी आ.संदीप क्षीरसागर आक्रमक:बैठक घेऊन केल्या सूचना..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

नागरी सुविधांसाठी आ.संदीप क्षीरसागर आक्रमक:बैठक घेऊन केल्या सूचना..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.