• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

चोरट्यांच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 16, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

मुंबईत (प्रतिनिधी) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे (पश्चिम) येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास घडली. सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला व त्यांच्यावर हल्ला केला.

रुग्णालयात तातडीने उपचार

हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ यांना सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. सध्या न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

सैफच्या मानेला १० सेंटीमिटरची जखम..

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे.”

सैफ अली खानच्या प्रकृतीची माहिती

डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले की, “शस्त्रक्रियेनंतरच आणखी अपडेट सांगता येईल. सैफ अली खान सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल.”

या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सैफ अली खानच्या घरात घडलेला हा प्रकार त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.सैफ अली खानच्या चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. सध्या घरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे गोळा करून तपास करण्यात येत आहे.

Previous Post

वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.