• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 15, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

बीड(प्रतिनिधी) संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मीक करायला मोका कोर्टाच्या विशेष न्यायाधीश सुनीता देशमुख यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती
सुरुवातीला वाल्मिक कराड याला केवळ खंडणी प्रकरणी आरोपी करण्यात आलं होतं. मात्र, काल याच प्रकरणी जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर तात्काळ एस आय टी ने वाल्मिकला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी बनवून त्याच्यावर मकोका लावला. त्यामुळे आज कोठडी मिळविण्यासाठी SIT ने त्याला कोर्टात हजर केलं आहे.

एस आय टी चा कोर्टात खळबळजनक दावा

सुरुवातीला एस आय टी चे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला हत्या प्रकरणातील तपासाबाबतची माहिती दिली. त्यानंतर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.

युक्तिवादाच्या सुरुवातीलाच सरकारी वकिलांनी हत्या प्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केला. त्यांनी कोर्टाला माहिती देताना सांगितलं की, ‘9 डिसेंबरला खून झाला… या दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 या दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं आहे.’

यावेळी काय बोलणं झालं? याची तपासणी करायची आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांची 10 दिवसाची कस्टडी एस आय टी ने मागितली

हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धकमी दिली होती – SIT चा दावा

दरम्यान, या प्रकरणी SIT एक अत्यंत धक्कादायक आरोपही वाल्मिक कराडवर लावला आहे. ज्याबाबत कोर्टात माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की, ‘हत्या प्रकरणातील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. ते एकमेकांना ओळखतात. सर्वांनी एकत्रित येऊन आणि एकमेकांच्या संपर्कात राहून खंडणी सारखे गुन्हे केले.’

‘दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती.’ असा दावा एसआयटीकडून कोर्टात करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडवर मकोका का लावण्यात आला?

वाल्मिक कराडवर नेमका मकोका का लावण्यात आला याची माहितीही सरकारी वकिलांच्या वतीने कोर्टात देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याची यादीच सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सादर केली आहे. MCOCA का आणि कसा लावण्यात आला यासाठी हे पुरावे एस आय टी कडून देण्यात आले आहेत.

Previous Post

कराडचा मुक्काम कोठडी क्र-९ मध्ये:आजही न्यायालयात आणणार

Next Post

चोरट्यांच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

चोरट्यांच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी..

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.