• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

कराडचा मुक्काम कोठडी क्र-९ मध्ये:आजही न्यायालयात आणणार

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 15, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, ताज्या बातम्या
0

बीड (प्रतिनिधी) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आली आहे. यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.बीडच्या मध्यवर्ती कारागृहातील ९ क्रमांकाच्या बराकीत वाल्मिक कराडला ठेवण्यात आले आहे. बीडच्या या सेंट्रल जेलमध्ये कराड हा अस्वस्थ दिसून आल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या १४ दिवस सीआयडीकडून वाल्मिक कराडची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करण्यात आली.खंडणी आणि संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यात काही संबंध आहे का ? याचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून केला जात आहे. मंगळवारी कराडची १४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्याविरोधात मकोका अंर्तगत गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. मकोका लागला असल्याचे समोर आल्यानंतर कराडचे समर्थक आणखीच आक्रमक झाले. टायर जाळणे, निदर्शने करत त्यांनी संताप व्यक्त केला.

बीड सेंट्रल जेलमधील पहिली रात्र कशी होती?

बीडच्या सेंट्रल जेलमध्ये वाल्मिक कराडची रवानगी करण्यात आली. सेंट्रल जेलमधील पहिल्या रात्री वाल्मिक कराड याने रात्री जेवण न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कराडला याआधीच काही वैद्यकीय त्रास जाणवत आहेत. त्यातच आता त्याने रात्रीचे जेवण टाळले. त्यामुळे त्याच्य आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड हा बीड जिल्हा कारागृहाच्या बॅरेक ९ मध्ये आहे. खंडणी प्रकरणात न्यायालयीन कुठोडी सुनवल्यानंतर वाल्मीक कराडची कालची रात्र बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली.

आज कोर्टात हजर करणार…

वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करणार आहे. एसआयटीकडून या प्रकरणी कोठडीची मागणी करण्यात येईल. त्याशिवाय एसआयटी आजच्या सुनावणीत कोणता महत्त्वाचा दावा करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

परळीत तणावपूर्ण शांतता…

परळीमध्ये आज तणावपूर्ण शांतता असून सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. परळी शहरातील मुख्य बाजारातील दुकाने बंद असून तुरळक वाहने वगळता शुकशुकाट दिसून येत आहे. राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धनंजय मुंडे हे देखील परळीत दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे आज आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन करण्याची शक्यता आहे. मंगळवारी, सकाळपासून कराड समर्थकांनी आंदोलनास सुरुवात केली होती. वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनीदेखील महिलांसह परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. कराडला मकोका लावल्याचे समोर येताच समर्थक अधिकच आक्रमक झाले होते. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले. तर, एका समर्थकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Previous Post

वरण झाले स्वस्त,तूर डाळ ५० रुपयांनी उतरली..

Next Post

वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.