• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

वरण झाले स्वस्त,तूर डाळ ५० रुपयांनी उतरली..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 15, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, खाद्य भ्रमंती
0

बीड (प्रतिनिधी) मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यतेने सांगलीतील ठोक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे ५० रुपयांनी उतरले आहेत. तूरडाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत.यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असून वरण स्वस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.नवीन हंगामातील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नसली तरी सरासरी दर क्विंटलला ७ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत.मंगळवारी सांगलीच्या बाजारात तूरडाळीचा दर क्विंटलला १३ हजार ५०० रुपये होता. पंधरा दिवसांपूर्वी याच तूरडाळीचा दर क्विंटलला १७ हजार ५०० रुपये होता. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर किलोला १९० रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता १५० रुपयांपर्यंत उतरले आहेत. तर ऐन दसरा-दिवाळीमध्ये हरभरा डाळीचे दर ११० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. अद्याप नवीन हंगामातील हरभरा बाजारात येण्यापूर्वीच हरभरा डाळीचे दर २० रुपयांनी खाली आले आहेत. मसूर डाळीचे दर किलोला ९० रुपये स्थिर असले तरी मूगडाळीचे दर मात्र किलोला १० ते १५ रुपये उतरले आहेत. नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. तरीही किरकोळ आवक असलेल्या तुरीचा दर किमान ७००० ते ८००० रुपये असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

बाजारपेठेतही घट

लातूर बाजारपेठेतही तूरडाळीच्या दरात पन्नास रुपयांची घट झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत १७५ रुपये किलोपर्यंत तूरडाळीचे भाव होते ते आता घसरून १२५ रुपये किलोपर्यंत आले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या प्रांतात तुरीचे विक्रमी पीक आले आहे. देशांतर्गत तुरीची मागणी ४२ लाख टनांची आहे. यंदा तेवढे उत्पादन देशांतर्गतच होण्याची शक्यता आहे. शिवाय बाहेरील देशांतून सुमारे दहा लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत. यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे.

अन्य डाळीही स्वस्त

यंदा पावसामुळे तुरीसोबतच अन्य डाळींचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने त्यांचे दरही घसरले आहेत. डिसेंबरपर्यंत ११० रुपये किलो असलेली हरभरा डाळ २० रुपयांनी तर मूगडाळ १५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मसूर डाळीचे दर किलोला ९० रुपयांवर स्थिर असले तरी तिचेही दर काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.

नवीन हंगामातील तूर बाजारात आल्यानंतर दरात मोठी घसरण होण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी शिल्लक साठ्यातील तूरडाळ विक्रीस काढल्याने दर कोसळले आहेत. नवीन उत्पादन बाजारात आल्यावर तूरडाळीचा दर शंभरपर्यंत खाली येऊ शकतो.

Previous Post

अखेर वाल्मिक कराडवर मकोका!एस आय टी ताबा घेणार…

Next Post

कराडचा मुक्काम कोठडी क्र-९ मध्ये:आजही न्यायालयात आणणार

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कराडचा मुक्काम कोठडी क्र-९ मध्ये:आजही न्यायालयात आणणार

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.