• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीसीसीआयच्या सचिवपदी देवजीत सैकिया…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 12, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

मुंबई (प्रतिनिधी) माजी यष्टीरक्षक फलंदाज देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सचिवपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्या जागी सैकिया हे पद स्वीकारतील.सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते. कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. सैकिया यांची सचिवपदी निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम करत होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणतेही रिक्त पद ४५ दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. जय शाह यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर ४३ व्या दिवशी बैठक बोलावली.

देवजीत सैकिया हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी १९९० ते १९९१ पर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यांची क्रिकेट कारकीर्द खूपच लहान राहिली आणि या काळात त्यांनी ५३ धावा केल्या आहेत. त्यांनी विकेटच्या मागे नऊ विकेट्स घेतल्या. क्रिकेटनंतर त्यांनी लॉमध्ये करिअर केले आणि वयाच्या २८ व्या वर्षी ते गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील झाले. त्याच वेळी, स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत, त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि उत्तर रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.

देवजीत सैकियांची क्रिकेट प्रशासनातील कारकीर्द २०१६ मध्ये सुरू झाली, जेव्हा ते आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) च्या सहा उपाध्यक्षांपैकी एक बनला, ज्याचे अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा होते. जे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत. सैकिया २०१९ मध्ये एसीएचे सचिव झाले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची बीसीसीआयचे संयुक्त सचिव म्हणून निवड झाली.

Previous Post

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द;परवाने खिरापती सारखे वाटणाऱ्यावर कारवाई कधी

Next Post

मकर संक्रांती ॥

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मकर संक्रांती ॥

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.