
2024 : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी (दि. 2) या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली.
17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11:00 वाजता राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गुकेश गेल्या महिन्यात वयाच्या 18 व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व करत सलग दुसरे कांस्यपदक मिळवले, तर पॅरालिम्पिक उंच उडीपटू प्रवीणने 2.08 मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदक जिंकले.
अर्जुन पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या 32 खेळाडूंच्या यादीत 17 पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे.
2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकर, खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने दु:खी होती. मनू भाकरने दावा केला होता की तिने पुरस्कारासाठी ऑनलाइन पोर्टलवर तिचे नाव पाठवले होते, तरीही ती 30 नावांच्या शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकली नव्हती. मनू भाकरने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ऑलिम्पिक कांस्य पदके जिंकली होती. 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात आणि मिश्र दुहेरीमध्ये ती तिस-या क्रमांकावर राहिली. तिच्या दोन पदकांच्या जोरावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदके जिंकली.
ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू
डी गुकेश (बुद्धिबळ)
हरमनप्रीत सिंग (हॉकी)
प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
मनू भाकर (शूटिंग)
अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू
ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
नीतू (बॉक्सिंग)
स्वीटी (बॉक्सिंग)
वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
सलीमा टेटे (हॉकी)
अभिषेक (हॉकी)
संजय (हॉकी)
जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
सुखजित सिंग (हॉकी)
राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
कपिल परमार (पॅरा ज्युदो)
मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
सरबज्योत सिंग (शूटिंग)
अभय सिंग (स्क्वॉश)
साजन प्रकाश (पोहणे)
अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)
सुचा सिंग (ॲथलेटिक्स)
मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
दीपाली देशपांडे (शूटिंग)
संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल)
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2024
चंदिगड विद्यापीठ (एकूणच विजेते विद्यापीठ)
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (प्रथम उपविजेते विद्यापीठ)
गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (द्वितीय रनर अप विद्यापीठ)