
पुणे (प्रतिनिधी) संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत.यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सीआयडीतील सूत्रांनी दिली. वाल्मीक कराड आजच शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी झाली होती.
बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर झाला आहे. मंगळवार दि ३१ डिसेंबर रोजी १२ वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक करफ सरेंडर झाला आहे.कराड समर्थकांनी या ऑफिसबाहेर गर्दी केली आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. त्यांनी वाल्मीक कराड याच्या निकटवर्ती लोकांची कसून चौकशी केली. त्याशिवाय पासपोर्ट रद्द करण्याची सरकारकडे मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मीक कराड यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता . आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार होते . त्यामध्ये वाल्मीक कराड पण होता. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी मात्र आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे.
पुण्यातून चार सीआयडीची विशेष पथके वाल्मीक कराडच्या शोधासाठी सक्रिय होते. पुण्यातून पहाटे २ तर सकाळी १ पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालेले होते.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जातेय. सीआयडीने वाल्मीक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला आहे. त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. त्याशिवाय सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मीक कराडला आज सरेंडर करणे भाग पडले.