• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

दत्तधाम मधील श्रीदत्त मूर्तीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 29, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

बीड/प्रतिनिधी
शहरातील फुलाईनगर भागात गुरुवार दि 26 रोजी श्री.दत्त मुर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली, यावेळी भाविक दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दत्तधाम परिसरातील मंदिराचे बांधकाम भाविकांनी स्वयंप्रेरणेने हाती घेतले होते यात मंदिर आणि मुख्य गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्याआधी दि 25 रोजी श्रीदत्त मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत परिसरातील सारे परिवार सहभागी झाले होते. दि 26 रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि सद्गुरू साडेगावकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली,तसेच दि 27 रोजी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता तिन्ही दिवशी भाविकांनी मोठया प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

बीड शहरातील फुलाई नगर गुरुप्रसाद कॉलनी एकता नगर व्यंकटेश कॉलनी येथील भाविक भक्तांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य श्रीदत्त मंदिराचे काम सुरू असून सध्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी दत्तमूर्ती देखील आणण्यात आली, दिनांक 25 रोजी दुपारी चार वाजता भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली,आणि दिनांक 26 गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता यजमान पत्रकार प्रशांत सुलाखे,उद्योजक अतुल संघांनी,शामसेठ क्षीरसागर,संतोष कुलकर्णी, योगेश खडके यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला,या सोहळ्यासाठी श्रीसमर्थ संस्थान साडे भोगलगाव येथील सद्गुरू सुरेश महाराज रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती,सायंकाळी चार वाजता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता तर रात्री 8 ते 10 या वेळेत नादब्रह्मच्या स्थानिक कलाकारांचा गुरुवार पंचपदी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,दिनांक 27 रोजी याच भागात असलेल्या संदीप कुलकर्णी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,या तीनही दिवसात दत्त भक्तांनी मोठी गर्दी केली होती
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे पौरोहित्य संतोष रत्नपारखी, जीवन पाठक, संतोष कुरलेकर,अनिकेत दाणी,सिद्धेश जोशी,आणि केशव पाठक यांनी केले,यावेळी विधिवत कार्यक्रमात प्रायश्चित्त संकल्प,प्रधान संकल्प,गणपती पूजन, मातृका पूजन,नांदीश्राद्ध,देवता स्थापन,अग्निस्थापन,मूर्ती जलाधिवास,नवग्रह हवण, स्नपण,तत्वन्यास,शय्याधिवास,मूर्तीप्राणप्रतिष्ठा,बलिदान पूजन करण्यात आले यावेळी हजारो भाविक उपस्थित होते,परिसरात एकमेव दत्तमंदिर झाल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

सेलूकर महाराजांची भेट…
यज्ञयाजी यज्ञेश्वर शास्त्री सेलूकर महाराज यांनी आज श्रीदत्त मंदिर दत्तधाम येथे भेट देऊन श्रीदत्त दर्शन घेत आरती केली यावेळी मंदिराच्या वतीने प्रशांत सुलाखे यांनी स्वागत केले यावेळी संतोष रत्नपारखी, किशोर चव्हाण, विलास खडके,प्रकाश देशमुख,वैभव देशमुख, संतोष कुरलेकर आदी उपस्थित होते

Previous Post

शस्त्र परवाने रद्द का करू नयेत? बीडमध्ये २६० जणांना नोटीस

Next Post

आ.सुरेश धासांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

आ.सुरेश धासांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी…

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.