
अध्यक्षपदी स्नेहल पाठक, महामंत्रीपदी डॉ.जगदीश देशमुख सरंक्षक म्हणून भरतअण्णा लोळगे आणि मंत्रीपदी प्रमोद वझे यांची निवड.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) संस्कार भारती देवगिरी प्रांताची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी स्नेहल पाठक, महामंत्रीपदी डॉ.जगदीश देशमुख, सरंक्षक म्हणून भरतअण्णा लोळगे यांची निवड करण्यात आली आहे. येथील शास्त्रीनगर सभागृहात संस्कार भारतीची विशेष सर्वसाधारण सभा संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष आडोनी आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली,यावेळी संस्कार भारती देवगिरी प्रांताची नवी रचना आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
संपूर्ण कार्यकारिणी-
संरक्षक-भरतअण्णा लोळगे,सल्लागार- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष-स्नेहलताई पाठक, कार्याध्यक्ष – भगवानराव देशमुख, उपाध्यक्ष-विश्वनाथ दाशरथे,डॉ.अरविंदराव देशमुख, सुनीता घाटे,देवेंद्र कुलकर्णी, महामंत्री – डॉ.जगदीश देशमुख,सह महामंत्री – सतीश महामुनी आणि अभय शृंगारपुरे, मंत्री प्रमोद वझे,रवींद्र देशपांडे, शरद दांडगे,धनंजय देशपांडे,कोष प्रमुख-मोहन रावतोळे, सह कोषप्रमुख – संजय घायाळ,मातृशक्ती प्रमुख – गीता रावतोळे,मंचीय कला संयोजक -डॉ जयंत शेवतेकर,संगीत – पं. संजय जोशी, सहसंगीत – दिलीप चौधरी,नृत्य- रमा करजगावकर आणि विक्रांत वायकोस, नाट्य- निलेश देशपांडे,सहनाट्य – विजय करभाजन आणि गिरीधर पांडे,दृश्य कला संयोजक – शेषनाथ वाघ,सह संयोजक – संतोष पाठक,भू-अलंकरण – अमित देशपांडे,छायाचित्र-फोटोग्राफी – पद्माकर मोकासे,चित्रकला- केदार नाईक, सह चित्रकला- अनिल पाटील,लोककला संयोजक – डॉ.मार्तंड कुलकर्णी,सह संयोजक – डॉ.वैशाली गोस्वामी,सारंग रोकडे,शेखर भाकरे,साहित्य विधा संयोजक – डॉ.विद्यासागर पाटांगणकर, सह संयोजक – नारायण पांडव आणि धनंजय गुडसुरकर,कला धरोहर संयोजक – प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी,सह संयोजक- अजय कासोदेकर,प्रचार व प्रसिद्धी प्रमुख- महेश वाघमारे, कार्यकारिणी सदस्य – जयेंद्र कुलकर्णी.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.विशेष सर्वसाधारण सभेचा प्रारंभ संस्कार भारती ध्येयगीत गायन, दीपप्रज्वलन,नटराज पूजन आणि पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून करण्यात आला. प्रारंभी पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी संस्कार भारतीच्या कार्याची नवी रचना विस्ताराने सांगितली तर अ. भा.मंत्री आशुतोष आडोनी यांनी मार्गदर्शन केले. आपले दायित्व हे मनःपूर्वक निभावले पाहिजे असे सांगून ते म्हणाले की विविध कार्यक्रम आयोजित करतांना यातून कलेच्या माध्यमातून देशहित आणि देशभक्तीचा विचार मांडला गेला पाहिजे.मानवी मनातील वाईट विचार दूर करण्यासाठी कला हे सर्वोत्तम साधन असून कलेच्या माध्यमातूनच समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करीत सद्विचाराची पेरणी करता येते.आपल्या विस्तारित भाषणात त्यांनी विविध उदाहरणे देऊन आपले विचार स्पष्ट करीत संस्कार भारतीच्या पदाधिकारी आणि कला साधकांनी आपली कला राष्ट्राप्रति समर्पित करावी असे आवाहन केले.देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा स्नेहल पाठक यांनी अध्यक्षीय समारोप करून नूतन पदाधिकारी बरोबर घेऊन अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.या सभेचे आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन नारायण पांडव यांनी केले. सामूहिक पसायदान गायनानाने या विशेष सर्वसाधारण सभेचा समारोप करण्यात आला.या विशेष सर्वसाधारण सभेस संस्कारभारतीचे मार्गदर्शक ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड, माधुरी धोंड यांची प्रमुख उपस्थिती लाभली .सभेच्या आयोजनात संस्कारभारती छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ कलासाधक अनिल संवत्सर,नाट्यविधा प्रमुख श्रीपाद पदे, अनुजा पाठक, कैलास आडे या कलासाधकांनी विशेष प्रयत्न केले