• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 20, 2024
in बीड जिल्हा, ताज्या बातम्या
0
सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र आता या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आपली स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोणीही मास्टरमाइंड असला तरी देखील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच या खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे वाल्मिकी कराड यांच्यावर मकोका लावला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी सभागृहात दिली आहे.
दरम्यान “मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. कारण हे प्रकरण फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं नाही तर याची पाळेमुळे देखील खणावी लागणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. याशिवाय मस्साजोग या गावात पवनचक्कीचे काम उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र याठिकाणी देखील कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजेक्ट अधिकाऱ्याला देखील मारहाण करण्यात आली होती. परंतु, या घटनेत देखील वाल्मिक कराड यांनीच धमकी दिल्याचे समोर आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले आहे.

एसआयटी चौकशी होणार? :
याशिवाय सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या धक्कादायक प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्याअंतर्गत SIT तयार केलेली आहे. मात्र ती SIT या प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार असल्याचं म्हंटल आहे. कारण या घटनेप्रकरणी एसआयटी चौकशी केली तर गुन्ह्याच्या अनुषंगाने देखील सगळं तपास होईल. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे. मात्र ही चौकशी पुढील तीन ते सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Previous Post

प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे बिनविरोध सभापती…

Next Post

खातेवाटप जाहीर;गृह फडणवीसांकडेच तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

खातेवाटप जाहीर;गृह फडणवीसांकडेच तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.