• Contact Us
  • Home
Sunday, June 8, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिसरा आरोपी पुण्यात जेरबंद..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 11, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी) बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.प्रतिक भीमराव घुले ( वय 25, रा.टाकळी ता.केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर) हे आरोपी अगोदरच पोलिसांनी अटक केले आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली या आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं आणि रस्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.

या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी केली होती. ती मागणी देखील मान्य करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.

एक पोलीस अधिकारी निलंबित…

या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संबंधित पीएसआयचं निलंबन केले.

आ.पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

शंभर शकुनी मेल्यावर हे एक जन्माला आलेत…..

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी डॉ.रामेश्वर नाईक..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी डॉ.रामेश्वर नाईक..

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.