मायबाप जनतेसाठी सदैव तत्पर असणार-आ.संदीप क्षीरसागर
बीड दि.९ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघाचे तब्बल दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (दि.८) रोजी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करण्याची संधी आणि जबाबदारी मिळाली असून मायबाप जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त होताना दिली.
रविवारी (दि.८) रोजी महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आ.संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्णरण करून आ.क्षीरसागर यांनी आमदारकीची शपथ घेतली. बीड विधानसभा मतदारसंघाचे असलेले सर्व प्रश्न या पवित्र सदनात मांडून बीडच्या जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.