अंबड(प्रतिनिधी) स्व.श्री त्रिंबकराव जळगांवकर यांनी सुरू केलेला आणि गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगांवकर यांनी स्वरसातत्याने जोपासलेला शतकपूर्ती दत्त जयंती संगीत महोत्सव येत्या दि.13, 14 आणि 15 असा तीन दिवस आणि पाच सत्रात संपन्न होणार आहे. अंबड नगरपरिषदेच्या गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृह येथे या संगीतोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य संयोजक अरविंद जळगांवकर यांनी दिली आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायन,वादन, नृत्यकलेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
अंबड येथे शतक महोत्सवी संगीतोत्सवाचा प्रारंभ
दि 13 डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी 6-30 वाजता नांदी गायनाने होणार असून यानंतर उद्घाटन समारंभ होईल. श्री शिवम तोडकर ( छत्रपती संभाजीनगर ) यांच्या शहनाई वादनाने पहिल्या शुभरंभाच्या सत्राचा प्रारंभ होईल,त्यानंतर श्री.नागेश आडगावकर (पुणे )यांचे गायन, श्री .यशवंत वैष्णव (मुंबई) यांचे एकल तबलावादन , सुश्री पार्वती दत्ता (छत्रपती संभाजीनगर ) यांचे कथ्थक नृत्य, पं. रोनू मुजुमदार (मुंबई )यांचे बासरीवादन आणि पं. उल्हास कशाळकर ( मुंबई ) यांच्या गायनाने या सत्राचे समापन होईल .
दुसरे सत्र शनिवार दि 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता नांदी गायनाने सुरू होईल त्यांना श्री शंकर गिरी ( अंबड )यांचे गायन, श्री नितीश पुरोहित (पुणे)यांचे सरोद वादन , डॉ.वैशाली देशमुख ( छत्रपती संभाजीनगर) यांचे गायन,आणि श्री.कुमार मर्डुर (धारवाड) यांच्या गायनाने हे सत्र संपन्न होईल.
तिसरे सत्र 14 डिसेंबर 2024 शनिवारी सायंकाळी 6-30 वाजता नांदीने सुरू होईल,त्यानंतर आसावरी देगलूरकर-देसाई (पुणे ) यांचे गायन, श्री ईश्वर घोरपडे ( पुणे ) यांचे गायन, श्री .शांतीभूषण देशपांडे (छत्रपती संभाजीनगर), यांचे एकल हार्मोनियम वादन, पं.राजेंद्र कुलकर्णी आणि पं. प्रमोद गायकवाड (पुणे) यांचे बासरी आणि शहनाई सहवादन आणि पं. राम देशपांडे ( मुंबई ) यांच्या गायनाने या सत्राचे समापन होईल.
चौथे सत्र रविवार दि 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता नांदी गायनाने सुरू होईल,त्यानंतर श्री.दिनेश संन्यासी (जालना ), यांचे गायन,श्री.सचिन नेवपुरकर (छत्रपती संभाजीनगर ), यांचे गायन,श्री.अभिषेक काळे (सांगली) यांचे गायन,पं. सुनील कुलकर्णी (दिल्ली) यांचे गायन श्री. पंकज विशाल (दिल्ली) यांचे सतार वादन होईल,या सत्राचे समापन विदुषी कलापिनी कोमकली (देवास ) यांच्या गायनाने होईल.
पाचवे सत्र रविवार दि 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नांदी गायनाने सुरू होईल त्यानंतर श्री. विक्रांतजी वायकोस ,कलाश्री अकादमी शिष्यगण (छत्रपती संभाजीनगर ) यांचे भरत नाट्यम, श्री.रितेश आणि श्री.रजनीश मिश्रा (बनारस ) यांचे सहगायन , श्री. फारुक लतीफ (मुंबई) यांचे सारंगी वादन , पं.विश्वनाथ दाशरथे (छत्रपती संभाजीनगर ) यांचे गायन, विदुषी मंजुषा कुलकर्णी-पाटील ( पुणे ) यांचे गायन, पं. जयतीर्थ मेवूंडी (धारवाड) यांचे गायन आणि पं. राजा काळे ( मुंबई ) यांच्या गायनाने या शेवटच्या सत्राचा समारोप होईल.
सर्व गायक,वादक आणि नृत्य कलावंतांना तबल्यावर पं. अरविंदकुमार आझाद, पं. मुकेश जाधव ,श्री. ईशांत परांजपे ,श्री. दुर्जय भौमिक, श्री. प्रशांत गाजरे, श्री. धनंजय जळगावकर, श्री.अनिरुद्ध देशपांडे ,श्री जगमित्र लिंगाडे ,श्री .प्रसन्न देशपांडे ,श्री.कृष्णा चौधरी हे साथ संगत करणार आहेत तर हार्मोनियमवर श्री. सुयोग कुंडलकर, श्री .लीलाधर चक्रदेव, श्री. शांतीभूषण देशपांडे ,श्री. केदार देशमुख, श्री .मंगेश जवळेकर, श्री.यश खडके हे साथ संगत करणार आहेत तर पखवाजवर श्री.विश्वेश्वर जोशी यांची साथ असेल.या पाचही सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन श्री अरविंद जळगावकर यांनी समर्थ सांस्कृतिक मंडळ आणि देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.