• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन महाराष्ट्रात भाजप निरीक्षक….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 2, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी उद्या रात्री भाजपचे निरीक्षक मुंबईत येणार आहेत. भाजप हायकमांडने पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे .भाजपचे निरीक्षक मंगळवारी रात्री मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यांच्या उपस्थित राज्यातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून चुरस पहावयास मिळत असतानाच सर्वांचे भाजपचा (BJP) गट नेता निवडीकडे लक्ष लागले होते.

भाजपच्या विधीमंडळ नेत्याची नेमणूक करण्यासाठी हायकमांडने पक्ष निरीक्षक म्हणून विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकाच्या उपस्थित मंगळवारी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये विधीमंडळ नेते, प्रतोद, गटनेत्याची निवड केली जाणार आहे.

महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच तारखेला पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. दोन दिवसापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे येथे त्यांच्या गावी गेले होते. त्यामुळे महायुतीच्या बैठका थंडावल्या होत्या. मात्र, शिंदे हे रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडीना आता वेग येणार आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत. ते सोमवारी दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. यावेळी ते भाजपच्या हायकमांड सोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.

सोमवारी महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेतेमंडळीने सागर बंगल्यावर एकच गर्दी केली होती. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची ही आमदार मंडळी भेट घेऊन मंत्रीपदासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुक मंडळींनी मोठी गर्दी केली आहे

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थितीत राहणार आहेत. आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

Previous Post

संशय तुला आला का?पत्रकारांबद्दल बोलतांना खासदारांची जीभ घसरली….

Next Post

कसे करावे गुरुचरित्र पारायण……

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कसे करावे गुरुचरित्र पारायण……

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.