बीड(प्रतिनिधी)
माझा संशय तुझ्या बायकोला आला का?पोराला आला का?का तुला आला? आशा भाषा वापरीत पत्रकारितेचा अवमान केला आहे, त्यात तुम्ही सत्तेच्या बाजूने आहात असा आरोप देखील केला. पत्रकार हे लोकसभेचा चौथा आधारस्तंभ आहेत. असा जावई शोधही बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लावला आहे. बीडमध्ये आयोजित आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी जाहीर सभेत सोनवणे बोलत होते.
यादरम्यान सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ देखील घसरली आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा रंगली आहे.
विधानसभा निकालानंतर बजरंग सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त करत एक बातमी एका पत्रकाराने प्रसिद्ध केली होती. यावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय तुझ्या बायकोला आणि पोराला आला का? असं म्हणत सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ घसरली आहे. एवढेच नाही तर पत्रकारिता हा लोकसभेचा चौथा आधार स्तंभ आहे. असा जावई शोध देखील त्यांनी लावलाय. या वक्तव्यानंतर खासदार सोनवणे यांच्या विरोधात टीकेची झोड देखील उठवली जात आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा निसटता पराभव केला. या लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या.त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत खा.सोनवणे यांचे वास्तव्य आणि साखर कारखाना असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघासह पाच मतदारसंघात महाआघाडीला पराभव स्वीकारावा लागला यात शरद पवार राष्ट्रवादीच्या 3 उमेदवार होते,केवळ बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे स्वतःच्या जनसंपर्कावर विजयी झाले, त्यांना खासदार सोनवणे यांनी फारसे सहकार्य केले नसल्याची चर्चा होती आणि म्हणूनच काल त्यांनी पत्रकारांवर तोंडसुख घेतले, ज्याबद्दल पत्रकार तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
संदीपभैय्यांचे विरोधक पत्रकार परिषद घेऊन विचारत आहेत की, संदीपभैय्यांनी त्यांचे व्हीजन काय ते सांगावे. आता हा प्रश्न विचारण्याचा अधिकार केवळ बीडच्या जनतेला आहे. परंतु तरीही मी एक प्रश्न त्या विरोधकांना विचारू इच्छितो, जर संदीपभैय्यांकडे व्हीजन नसते तर बीडकरांनी त्यांना सलग दुसऱ्यांदा निवडून आणुन आमदार केले असते का? असा सवाल खा.बजरंग सोनवणेंनी या कार्यक्रमातून विरोधकांना केला. बीडकरांनी दुसर्यांदा वाघ विधानसभेत पाठवला आहे. हा खासदार बजरंग सोनवणे कायम तुमच्यासोबत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. संदीपभैय्यांच्या रूपाने पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा झेंडा बीडमध्ये फडकला आहे. असे खा.बजरंग सोनवणे याच कार्यक्रमात बोलताना म्हटले.