अंबाजोगाई – वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली.
ज्ञानराधा मल्टीस्टेट पाठोपाठ लागलीच राजस्थानी मल्टीस्टेटचा घोटाळा उघडकीस आला होता. ठेवीदारांना वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून जमा केलेल्या शेकडो कोटींच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरलेल्या चंदूलाल बियाणीसह सर्व संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मागील अनेक महिन्यापासून चंदूलाल बियाणी फरार होता. अखेर सोमवारी त्याने स्वतःहून अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सध्या ज्ञानराधा पतसंस्थेचे सुरेश कुटे,जिजाऊ पातसंस्थेचे बबन शिंदे हे तुरुंगात आहेत.