
पाणी उतरता देख,
मेरे किनारेपर घर
मत बसा लेना,
मैं समंदर हू लौटकर
वापस आऊंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत रात्री साडेबारा वाजता बैठक झाली यात
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर विचारे करण्यात आला यावर संघाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचचाही सहभाग होता.नेतृत्व कुणाकडं सोपवावं यावर यावेळी सखोल चर्चा झाली
मुख्यमंत्रिपदासाठी अन्य नावांचाही विचार झाला मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते असल्याचं सगळ्यांच्या मते निश्चित करण्यात आलं.
दिल्लीतल्या या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संघाच्या नेत्यांची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं स्पष्ट झालं. मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नावच योग्य असल्याचा निष्कर्ष या नेत्यांनी काढल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शाह आणि मोदींची ही चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचा मुंबईतून फोन आला. एकनाथ शिंदेंनीही भाजपनं मुख्यमंत्री ठरवावा आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावालाच दिल्लीतील भाजप वर्तुळात पहिली पसंती मिळाली.आता दिल्लीतून नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदिल मिळालाय. आता उत्सुकता आहे फक्त औपचारिक घोषणेची.
पाच वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षे जुना व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते पुन्हा परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी काव्यमय शैलीत आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले “मेरा पाणी उतरता देख,मेरे किनारेपर घर मत बसा लेना,मैं समंदर हू लौटकर वापस आऊंगा”. देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
उद्या दिल्लीत महायुतीची बैठक होणार
उद्या दिल्लीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली जाईल, असे मानले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे व आदींनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार अमित शहा यांची भेट घेत असतानाच एकनाथ शिंदे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले.