
राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. महायुतीचे बहुतांश नेते मोठ्या फरकाने जिंकले, यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे.
मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेले उमेदवार…
१) काशीराम वेचन पावरा
शिरपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे काशीराम वेचन पावरा १४५९४४ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र युवराज ठाकूर यांचा ३२१२९ मतांनी पराभव झाला.
२) शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोंसले
सातारा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोंसले१७६८४९मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमित कदम यांचा ३४७२५ मतांनी पराभव झाला.
३) धनंजय मुंडे
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे १४०२२४ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा ५४६६५ मतांनी पराभव झाला.
४) आशुतोष अशोकराव काळे
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे१२४६२४ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वर्पे संदीप गोरक्षनाथ यांचा ३६३२५ मतांनी पराभव झाला.
५) एकनाथ शिंदे
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार एकनाथ शिंदे १२०७१७ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांचा ३८३४३ मतांनी पराभव झाला.
६) चंद्रकांत पाटील
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ११२०४१ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे चंद्रकांत बलभीम मोकाटे यांचा ४७९९३ मतांनी पराभव झाला.
७) सुनील शेळके
मावाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके १०८५६५ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांचा ८२६९० मतांनी पराभव झाला.
८) प्रताप सरनाईक
ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रताप सरनाईक १०८१८५ मतांनी विजय झाले असून, त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार नरेश मणेरा यांचा ७६०२० मतांनी पराभव झाला.
९) केवळराम काळे
मेळघाट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केवलराम काळे यांचा १०६८५९ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाचे डॉ. हेमंत चिमोटे यांचा ३९११९ मतांनी पराभव झाला.
१०) दादाजी भुसे
मालेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार दादाजी भुसे १०६६०६ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार प्रमोद बंदूकाका यांचा ५१६७८ मतांनी पराभव झाला.
११) शंकर जगताप
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर जगताप १०३८६५ मतांनी विजयी झाले असून, त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांचा १३१४५८ मतांनी पराभव झाला.