

गेवराई, दि.२५ (प्रतिनिधी) ः- माझा लढा सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आणि जन कल्याणासाठी आहे, गेवराई विधानसभा मतदार संघाचा सर्वांगिन विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे. जनसेवेचा वसा आणि वारसा अविरत पुढे सुरु ठेवण्यासाठी मला एकवेळ संधी मिळाली असं मी मानतो असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी म्हंटले आहे.आज विजयसिंह पंडित हे 42,332 आशा प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत, आपला विजय जनतेला समर्पित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.






