मुंबई (प्रतिनिधी). महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज अॅक्सिसने वर्तवला असून महाविकास आघाडीचा दारूण पराभव होणार असल्याचे अॅक्सिसचे म्हणणे आहे.
महायुती १७८ ते २०० जागा मिळवून प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचे भाकीत अॅक्सिसने वर्तवले आहे तर युतीची सत्ता घालवून सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महाविकास आघाडीचा सुपडासाफ होईल, असा अंदाज अॅक्सिसने वर्तवला आहे.त्याचबरोबर ६ ते १२ जागा अपक्षांना मिळण्याचा अंदाज देखील अॅक्सिसने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विभागनिहाय जागांची आकडेवारी देखील अॅक्सिसने प्रसिद्ध केली आहे.
Maharashtra – Exit Poll – Overall Seat Share (288 Seats) & Vote Share(%)
महायुती – १७८-२००
भाजप – ९८- १०७
शिवसेना – शिंदे गट – ५३-५८
राष्ट्रवादी अजित पवार गट – २५-३०
इतर – २-५
महाविकास आघाडी – ८२-१०२
काँग्रेस – २८-३६
ठाकरे गट – २६-३२
राष्ट्रवादी- पवार गट – २६-३०
सपा – २-४
वंचित आघाडी – ०
इतर – ६-१२
उत्तर महाराष्ट्र-एकूण जागा महायुती-३८ , महाविकास आघाडी-७
पश्चिम महाराष्ट्र-एकूण जागा ५८, महायुती-३६ , महाविकास आघाडी-२१
मराठवाडा-एकूण जागा ४६, महायुती-३० , महाविकास आघाडी-१५, इतर-१
विदर्भ-एकूण जागा ६२, महायुती-२९ , महाविकास आघाडी-२०, इतर ३
मुंबई-एकूण जागा ३६, महायुती- २२, महाविकास आघाडी-१४
कोकण-ठाणे-एकूण जागा ४९, महायुती-२४ , महाविकास आघाडी-२३, इतर-२