बीड/प्रतिनिधी
ब्राम्हण समाजातील युवकांनी बेवारस मयत महिला सुशीला मधुकर जोशी वय 50 वर्ष राहणार काळे गल्ली बीड यांचा अंत्यविधी केला नातेवाईकांनी नकार दिल्यामळे दिनांक 21/11/2024 रोजी दुपारी 2 वाजता सुमारास ब्राम्हण सजातील रूढी परंपरा नुसार माय माऊलीचा अंत्यविधी पार पाडला त्यांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च सामाजीक कार्यकर्ते सागर देशपांडे यांनी केला अत्यंविधीसाठी समाज बांधव उपस्थित होते
मयत महिला नामे सुशीला मधुकर जोशी वय 50 वर्षे राहणार काळे गल्ली बीड ही दिनांक 18/11/2024 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आय.सी.यु वार्ड मध्ये मरण पावलेली होती तीचा नवरा मयत असून तिला मुलगा मुलगी कोणी नाही तिला एक बहीण असून तिचे न नाव रुक्मिणी बडवे असे असून ती पैठण येथील रहिवासी असून तिला फोनवर संपर्क केला असता तिने येऊ शकत नाही असे कळविले व तिचा मुलगा सचिन बडवे यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल लागला नाही तसेच तिला इतर कोणी नातेवाईकही नाहीत, तिचे प्रेत अंत्यविधीसाठी ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला होता त्यामुळे ब्राम्हण समाजातील तरुणांनी पुढाकार घेत आज सदरील महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ब्राम्हण समाजातील मान्यवर उपस्थित होते