• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सेवेची संधी द्या-आ.संदीप क्षीरसागर

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 19, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी): बीड मतदार संघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्याची संधी आपल्याला असून यापूर्वी तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच बीड मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित प्रश्‍न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. बरीच विकासकामे पुर्णत्वास नेता आली आहेत असाच आशिर्वाद पाठीशी कायम ठेवून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा मी आपल्या प्रत्येक मताचा आदर करीत मतदारसंघांला विकासाच्या मोठया उंचीवर नेऊन सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले की,आता आपण सर्वांनी आपला पक्का निर्धार करुन पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विचारांची सत्ता आणण्यासाठी आपले मतदान वाया जाणार नाही, यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे करावे. विरोधक गेले अनेक दिवस अनेक आरोप करत आले आहेत, आता तर निवडणूक आहे, मतदारांची दिशाभूल करुन ते आरोप करत होते पण मतदारसंघातील सुजान मतदार बंधूच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मला ओळखता.त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी. आपला बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ कायम आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या भूमिकेसोबत,विचारांसोबत राहिलेला आहे. संघर्षाच्या स्थितीतही आपण त्यांच्यासोबत कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पवारांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा व महाविकास आघाडीचा बीडचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आहे म्हणून आज आपण अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.

Previous Post

सर्वांशी असलेले आपुलकीचे नाते हीच आ.संदीप क्षीरसागर यांची खरी ताकद- दीपक कुलकर्णी

Next Post

बीड मतदार संघात 58.33% मतदान

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बीड मतदार संघात 58.33% मतदान

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.