• Contact Us
  • Home
Thursday, August 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा केलेल्या कामावर बोलावे. – विजयसिंह पंडित

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 18, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0


गेवराई दि. १८(प्रतिनिधी) सध्याच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विरोधक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु सत्ता भोगलेल्या दोन्ही विरोधकांनी शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्या सत्ता काळामध्ये केलेल्या कामावर बोलावे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून मत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. गडकरी साहेबांच्या धोरणानुसार झालेल्या रस्त्याचे श्रेय स्वतः घेतात. यांना साधे स्वतःच्या मतदार संघातील गावे माहीत नाहीत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केली. ते पिंपळनेर मधील कॉर्नर सभेमध्ये बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोईफोडे, अजहर मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विकास हाच आमचा श्वास व विकास हाच आमचा ध्यास आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पिंपळनेर साठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. आरोग्य केंद्राच्या जागेसाठी स्वतः आर्थिक मदत केली. भैय्यासाहेबांनी पिंपळनेर ची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मी निवडून आल्यानंतर पिंपळनेर तालुका व्हावा यासाठी प्रयत्न करीन. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलल्यामुळे जिल्हा परिषद चे उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना माहित आहे की, ते निवडून येणार नाहीत. परंतु माझे मत खाण्यासाठी ते उभा राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करून आपले मत वाया घालू नका. खास करून नव मतदारांनी आपले मत अशा मत विभाजन करणाऱ्या लोकांना न देता विकासाचे व्हीजन असणारे, अठरापगड जाती जमातींना सोबत घेऊन चालणाऱ्या शिवछत्र परिवारातील एक सदस्य म्हणून मला द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आकडे म्हणाले की, लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले आहेत. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, सुमारे ५२ लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये दिले आहेत. या सर्व योजना पुढे चालू ठेवण्यासाठी राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांच्या भाऊ गर्दीमध्ये विकासाची दृष्टी असणारे, सुसंस्कृत, उच्चशिक्षित असे विजयसिंह पंडित हेच योग्य उमेदवार आहेत. म्हणून विजयसिंह पंडित यांना मोठ्या मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील पाटील, दादासाहेब खिंडकर, समीर भाई, गणपत डोईफोडे यांनी मतदारांशी संवाद साधला तर चंदू गायकवाड व मित्र मंडळ यांनी घोंगडी देऊन विजयसिंह पंडित यांचा सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे धनंजय मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखाना चे संचालक सुनील पाटील, बळवंत चव्हाण, सांडरवन चे सरपंच प्रशांत लांडे,
बेडकुचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच दादासाहेब खिंडकर, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश नागरगोजे, लिंबारुई चे सरपंच उद्धव पैठणे, ताडसोन्ना चे युवा नेते प्रतापराव माने, सुनील शिंदे, रंजेगाव चे सरपंच लक्ष्मण आबुज, रंजेगावचे माजी सरपंच रामभाऊ अबूज, प्रमोद माने, वशिष्ठ कुटे, दत्ता पाटील, राधेश्याम घुमरे, समीर भाई सय्यद, भाऊसाहेब डावकर, किशोर सुरवसे, संजय नरवडे, अमर शेख, राम जाधव, बाबा आरे, गोविंद साठे, रमेश पवार, चंदू गायकवाड यांच्यासह पिंपळनेर गावातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजी-माजींनी पंचवीस वर्षात विकासाचे काय दिवे लावले ? पृथ्वीराज पंडिताचा सवाल


गेवराई दि. १८ (प्रतिनिधी) आमच्या विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात विकासाचे काय दिवे लावले हे जनतेला सांगावे, याउलट आम्ही तालुका भरातील जनता हा विकास केंद्रबिंदू मानून शिवछत्र परिवाराने सत्ता नसताना देखील विकासाची प्रचंड कामे गावागावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, हा विकासाचा वेग कायम सुरू ठेवण्यासाठी येणाऱ्या २० तारखेला मतदार राजांनी जागृत होऊन विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता महायुतीचे लाडके उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पृथ्वीराज पंडित यांनी आपल्या काकाच्या प्रचारार्थ विवीध गावच्या बैठकातून बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ तालुकाभरातील तरटेवाडी कोळगाव, बोरगावथडी, राहेरी गंगावाडी, पांगुळगाव, निरगाव पांढरी तलवाडा, अर्धमसला, मुधापुरी, गायचारी तांडा, भिलखोरी तांडा, भेंड खुर्द आधी गावांना भेटी देऊन प्रचाराचा धडाका पृथ्वीराज पंडित यांनी सुरूच ठेवला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत मतदारांनी दक्ष राहून विकास कामे कोण करतो याकडे लक्ष द्यावे विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात काय केले याचा हिशोब मतदारांनी आता त्यांना मागितला पाहिजे शिवछत्र परिवार गेल्या अनेक दशकापासून सत्तेत नसतानाही भैय्यासाहेबांनी करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणला तर विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना विकासाला म्हणजेच तालुक्याला मोठे झुकते माप दिलेले आहे विकासा कामे तालुक्यातील घरादारापर्यंत पोहोचविले आहे. हे काम कायम सुरू ठेवण्यासाठी येत्या २० तारखेला विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन पृथ्वीराज पंडित यांनी केले. त्यांच्या प्रचार बैठकांना मतदारांमधून उत्तम प्रतिसाद लाभ होत आहे. युवा वर्ग, महिला, जेष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहत आहे. तरटेवाडी येथे करोडोची विकास कामे केली असे ते यावेळी म्हणाले, या प्रसंगी बोरगाव थडी येथील सरपंच सखाराम खटके, उपसरपंच विलास घोडे, सदस्य कृष्णा खटके, भगवान घोडे, आसाराम खटके, राम घोडे, संपत खडके,राजेंद्र खिल्लारे, शंकर लाड, खरेदी-विक्री संघाचे सदस्य दिनकर पघळ,माजी सरपंच विलास कुचेकर, प्रल्हाद लाड, रमेश फलके, रघुनाथ लाड, दिगंबर लाड, घनश्याम लाड, गोविंद फलके,गंगावाडी येथील उपसरपंच भगवान तवले,गोपाळ यादव, विलास यादव,गोरख बोराडे,जगन्नाथ पवार,ईश्वर काळे,अर्जुन यादव,लक्ष्मण चिकणे,माजी सरपंच भीष्मा बोराडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकांना मतदार तसेच युवा वर्ग,महिला,ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून ऊस्फुर्त असा प्रतिसाद लाभ होत आहे. त्यामुळे आता विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणे एवढेच बाकी आहे असे चित्र मतदारांमधून निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Previous Post

मोमीनपुरा याही वेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभा राहील-जयदत्त क्षीरसागर …

Next Post

विप्रनगर , खासबाग, इस्लामपुरा,बाबा चौकात आ.संदीप क्षीरसागरांच्या कॉर्नर सभांना मोठा प्रतिसाद…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

विप्रनगर , खासबाग, इस्लामपुरा,बाबा चौकात आ.संदीप क्षीरसागरांच्या कॉर्नर सभांना मोठा प्रतिसाद…

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.