
बीड (प्रतिनिधी)
मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे, आणि त्याच परिसराने मला ताकद दिली आहे. हीच ताकद आता योगेश क्षीरसागरच्या पाठीशी उभी राहावी, अशी अपेक्षा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्याचा गजर संपूर्ण बीड जिल्ह्यात घुमला पाहिजे.जी.एन. फंक्शन हॉलमध्ये आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश काळे, विलास बडगे, नवी दुजांमा, हाफिज साहब, मुखीद लाला, वाजिद कुरेशी, हरून हाजी साब, आणि खलील हाफिज यांची उपस्थिती होती.

जयदत्त क्षीरसागर यांनी पुढे बोलताना मतदारांना उद्देशून सांगितले की, “समस्या अनेक आहेत, पण त्या सोडवण्यासाठी संविधानिक पदाची गरज असते. निवडणुका सत्ता येण्यासाठी किंवा जाण्यासाठी नसतात, तर आपल्या समस्या कोण सोडवेल यासाठी असतात. गेल्या पाच वर्षांत चुकीच्या निर्णयांचे परिणाम आपण अनुभवले आहेत. त्यामुळे यावेळी योग्य उमेदवार निवडणे महत्त्वाचे आहे.
मी कधीच मुस्लिम समाजापासून अंतर ठेवले नाही. आपले नाते विश्वासाचे आणि प्रेमाचे आहे, जे मी कधीच ढळू देणार नाही. आपले मत अमूल्य आहे; त्याचा वापर विचारपूर्वक करावा. आम्ही वाळूचा ठेका, गुटखा विक्री किंवा क्लब चालवण्यास इच्छुक नाही. आम्ही जनसेवेसाठी कटीबद्ध आहोत. या उद्दिष्टांसाठी माझ्या नेतृत्वाखाली योगेश क्षीरसागर काम करेल, याची मला खात्री आहे.”
यावेळी नवीदुजांमा यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की, “भावनिक वातावरण निर्माण करून हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होईल. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. समस्यांचे निराकरण करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा. जयदत्त क्षीरसागर यांनी नेहमीच आपल्याला साथ दिली आहे. डॉ . योगेश क्षीरसागर हे तरुण, हुशार, आणि विकासशील दृष्टिकोन असलेले उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा देणे, म्हणजे आपल्या समाजाच्या विकासाला पाठिंबा देणे आहे.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मतदारांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या आवाहनाला पाठिंबा व्यक्त केला.
उच्चशिक्षित सालकरी ठेवण्यासाठी योगेशला आशीर्वाद द्या.चौसाळ्यात जयदत्त क्षीरसागर यांचे आवाहन.

“स्वर्गीय काकूंच्या वारशाचा आदर राखत, जनतेची सेवा करणारा, उच्चशिक्षित आणि समजदार आमदार विधानसभेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान करून योगेश क्षीरसागर यांना आशीर्वाद द्या,” असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी चौसाळा येथे झालेल्या संवाद मेळाव्यात केले याप्रसंगी व्यासपीठावर बाबूशेठ लोढा, नितीनशेठ लोढा, माधवराव मोराळे, एड. डोईफोडे, तांगडे साहेब, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,, सत्ता हे विकासाचे माध्यम असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत आपला माणूस असणे गरजेचे आहे. “दीर्घकालीन विकास, जनतेच्या अडीअडचणी सोडवणे आणि गावागावांमध्ये विकासाची गंगा पोहोचवणे ही आपली प्राथमिकता राहील. जातीपातीचे दाखले देऊन भावनिक बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना थारा देऊ नका,” असेही ते म्हणाले.
प्रलोभनांना दूर ठेवण्याचा सल्ला
“आम्ही सत्ता वाळूचे ठेके किंवा गुटखा क्लब चालवण्यासाठी मागत नाही. आम्हाला सत्तेत येऊन विकासकामे करायची आहेत. त्यामुळे तुमचे मत वाया घालवू नका,” असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले.यावेळी रामजी बाप्पा शिंदे, शिकुर शेठ, श्रीमंत सोनवणे, काकासाहेब जोगदंड, उपसरपंच अंकुशराव कळसे, सतीश भाऊ जोगदंड, लोणीचे माजी सरपंच बाबुराव मिटकरी यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या संवाद मेळाव्याला चौसाळा आणि पंचक्रोशीतील मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरखेड गावच्या सरपंचांनी गावकऱ्यांमार्फत माजी मंत्र्यांचा सत्कार केला.