
बीड (प्रतिनिधी) नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त मतदारांची गर्दी… गर्दी… आणि गर्दीच… व्यासपीठाच्या चारही दिशेला पहावे तिकडे गर्दीच…गर्दी आणि ‘संदीप भैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा एकमुखी घोषणा, अशा रेकॉर्डब्रेक गर्दीने बीड शहरातील मोमीनपुरा भागातील कॉर्नर बैठकीला अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले. या बैठकीतील मतदारांच्या प्रचंड गर्दीने आ. संदीप क्षीरसागर यांच्या विधानसभेच्या विजयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. ही गर्दी पाहून बीड मतदारसंघात आ. संदीप क्षीरसागर यांचे तुफान असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

उपस्थित मतदारांसमोर आ. संदीप क्षीरसागर यांनी तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांगत सर्वांनी येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तूतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या, असे आपुलकीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.
आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. बीड मतदारसंघातील जनता हीच माझी खरी ताकद आहे. आपण कायम आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने वाटचाल करणार असून आपल्या भूमिकेसोबत आज अनेक जण उभे राहत आहेत. आपला पक्ष अडचणीत असताना तुम्ही मला जी साथ दिली, त्यामुळेच आज आपण पुन्हा एकदा पक्षाची भूमिका घेऊन निवडणुकीत सामोरे जात आहोत.या निवडणुकीमध्ये मतदार संघाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण प्रचार पुढे नेत आहोत. मागील पाच वर्षात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विकासाच्या अनेक योजना राबवल्या.अनेक प्रश्न मार्गी लागले. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बीड मतदार संघाला सर्वांगीण विकसित करण्यासाठी आपण येत्या काळात काम करणार आहोत. मतदार संघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत. आज या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आशीर्वाद दिला आहे. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. . याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जावेद कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत हा संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी मतांची ताकद उभी करावी असे आवाहन मतदारांना केले.
शाहूनगर, बालेपीरमध्येही करिश्मा…

बीड मतदारसंघातील कामांची असलेली जाण आणि शहरासह गावोगावच्या ग्रामस्थांशी असलेला थेट संपर्क यामुळे या निवडणूकीत तरुण,युवक मित्र आ.संदीप क्षीरसागर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले असून त्यांनीच निवडणूक हाती घेतल्याने जाईल तिथे आ.संदीप क्षीरसागर यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा दिसून येत आहे. निवडणूक प्रचारार्थ आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील शाहुनगर व बालेपीर येथे कॉर्नर बैठक घेतली. याच बैठकीतून कार्यकर्त्यांनी ‘संदीपभैय्या आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच या दोन्ही ठिकाणच्या बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
प्रचाराच्या अगदी सुुरुवातीपासून आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्यासह पक्षाच्या सर्व जेष्ठ मार्गदर्शक नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. गावोगावी संवाद दौरे, कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रचार पुर्ण करत मतदार बंधु-भगिणींसह वडिलधारी मंडळींचे आशिर्वाद घेतले.
शनिवारी आ.संदीप क्षीरसागर यांची शहरातील शाहूनगर आणि बालेपीर भागातील कॉर्नर बैठकीला सभेचे स्वरूप आले. जमलेल्या युवकांसोबत अतिशय उत्साह आणि जोषपूर्ण वातावरणात आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांशी संवाद साधला.आपला बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या भूमिकेसोबत,विचारांसोबत राहिलेला आहे. आता संघर्षाच्या स्थितीतही आपण त्यांच्यासोबत कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा व महाविकास आघाडीचा बीडचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आहे.
अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
शहरातील शाहूनगर येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत जयदीप राऊत व बालेपीर येथील वसीम भाई यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. सर्व युवक,तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.