
गेवराई दि.१८ (प्रतिनिधी) माजी आमदार अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांना विकासाची दूरदृष्टी आहे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्था इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी गेवराई शहराच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण केलेले आहे, असे उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्व व्यापाऱ्यांच्या हितासाठी विधानसभेमध्ये जाणे आवश्यक आहे. या भागाच्या भरभराटीसाठी तुम्ही त्यांना प्रचंड मताने विधानसभेमध्ये पाठवा. मी आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे महामंत्री तथा चांदणी चौक दिल्लीचे खा. प्रवीण खंडेलवाल यांनी केले. ते गेवराई येथील व्यापारी महासंघाच्या संवाद बैठकीमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यावेळी बोलताना म्हणाले की, गेवराई शहराच्या भरभराटीसाठी व्यापाराचे महत्त्व ओळखून अमरसिंह पंडित यांनी भयमुक्त व्यापाऱ्याला प्राधान्य दिलेले आहे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, मार्केट कमिटी इत्यादीच्या माध्यमातून व्यापारास प्रोत्साहन दिले आहे. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असतो. व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो, त्यास हवेची दिशा कळते. आता घड्याळाची हवा असल्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग इथे उपस्थित झालेला आहे. तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा खंडेलवाल साहेबांच्या माध्यमातून मी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी बांधील असेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी कॅटचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संतोष कावळे पाटील, संभाजीनगर जिल्हा सचिव पंकज लोया, गेवराई व्यापारी महासंघाचे प्रतापराव खरात, बाळासाहेब बरगे, मार्केट मार्केट कमिटीचे संचालक दिलीप गंगवाल, शिव आप्पा सांभाहरे, सय्यद गुफरान, संजय भालशंकर, धनंजय बेदरे, राधेश्याम दातार, सुरेंद्र रुकर, प्रदीप रुकर, श्रीराम चौधरी, पंकज चर्तुमेहता, अरुण काका चाळक यांच्यासह गेवराई शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्था संघटनेचा पाठिंबा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी गेवराई विधानसभा मतदारसंघातून जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी विजयसिंह पंडित हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत, संस्कारशील व विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. अशा उमद्या नेतृत्वाला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्था संघटनेचा (मेस्टा) गेवराई च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांना जाहीर पाठिंबा देण्यात अशी माहिती मेस्टाचे अध्यक्ष विकास कोकाटे यांनी दिली तर खाजगी शिक्षण संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी विधीमंडळात आवाज उठवून न्याय मिळवून देईन, त्यासाठी मला खंबीर साथ द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले.
महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्था संघटनेचा( मेस्टा) विजयसिंह पंडित यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्था संघटनेचा (मेस्टा) चे अध्यक्ष विकास कोकाटे, उपाध्यक्ष विनोद खरात, सचिव सुमित बोरडे यांच्यासह आर. के. चाळक सर, फाटक सर, सानप सर यांच्या सर्व यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.