
सोमवारी दुपारी २ वाजता उमापूरला जाहिरसभा
गेवराई दि.१७ (प्रतिनिधी )
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराचा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने समारोप होणारा आहे . प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विजयसिंह पंडित यांनी यांनी जोरदार आघाडी घेतली असून ना.धनंजय मुंडे यांच्या सभेने विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. या जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण यांनी केले आहे यांनी केले आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराचा समारोप जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने होणार आहे. उमापुर येथे सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब गाडेकर, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, वीर लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब रोकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे यांच्यासह महायुतीतील घटकपक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी जोरदार आघाडी घेतलेली आहे. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून शिवछत्र परिवारातील प्रत्येक सदस्य प्रचारात उतरला. विरोधकांच्या अपप्रचाराला भीक न घालता विकासाच्या मुद्द्यावर विजयसिंह पंडित यांनी मतदारांशी साद घातली. त्यांना गाव, वाडी, वस्ती तांड्यावरून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रचाराचा समारोप ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने होणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर
ना. धनंजय मुंडे यांच्या सभेकडे मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे. या सभेने विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण उपसभापती विकास सानप, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन्नाथ शिंदे, जगनपाटील काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.