बीड(प्रतिनिधी)
“काकूंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले आणि आयुष्यभर लोकसेवेचा वसा अखंडपणे चालविला. कधीही काकूच्या नावाला गालबोट लागेल असे काम केले नाही. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवून लोकसेवा केली,” असे सांगत माजी मंत्री आणि लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी आता हा लोकसेवेचा वारसा डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे सोपवत असल्याचे जाहीर केले.
त्यांनी भावनिक आवाहनात सांगितले, “योगेश क्षीरसागर, जो सुसंस्कृत आणि अभ्यासू आहे, त्याच्याकडे लोकसेवेचा हा वसा आणि वारसा सोपवताना, त्याला आशीर्वाद द्या.”कार्यक्रमाच्या वेळी जयदत्त क्षीरसागर यांनी राजुरी गावाशी आपले मधुर संबंध पुन्हा व्यक्त केले , “राजुरीमध्ये शिक्षण घेतले आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला. काकूंच्या मार्गदर्शनाखाली राजकारण करताना, राजुरीची मान खाली जाणार नाही हे मी सुनिश्चित केले. आज गजाननाच्या आशीर्वादाने आणि काकूंच्या वसासोबत योगेशच्या हाती हा वारसा सोपवत आहे,” असे ते म्हणाले.
गटतट विसरून मतदान करा..
रवींद्र दादा क्षीरसागर यांचे म्हणणे होते, “पैसा आणि मस्ती जास्त काळ टिकत नाही. पैशापुढे संस्कार कमी पडले, याची खंत मनाला वाटते. काकू आणि अण्णांचा लोकसेवेचा वसा योगेशमध्ये आहे, आणि त्याला आपला पाठिंबा द्या.”
योगेश क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात सांगितले, “पंधरा वर्षांपूर्वीचे क्षीरसागर घराण्याचे वैभव पुन्हा राजुरीला प्राप्त करून देण्यासाठी, आणि काकूंचा वसा चालवण्यासाठी, मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद हवे आहेत. राजुरी कडे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी आणण्याचे प्राथमिक प्राधान्य असेल, आणि राजुरी सर्कलचा विकास पुन्हा सुरू करेन.”कार्यक्रमात राजुरी आणि पंचक्रोशीतील महिलांसह अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
जातीयतेच्या राजकारणाविरोधात
सावधगिरीचे आवाहन
कार्यक्रमात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर यांनी भाषणादरम्यान मतदारांना जाती-धर्माच्या नावाखाली होणाऱ्या राजकीय फूटपाडाविरोधात सावध राहण्याचे आवाहन केले.ते म्हणाले, “आपल्या जवळच्या व्यक्तीला निवडण्याऐवजी समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे. जातीयतेच्या मुद्द्यावर आधारलेले राजकारण समाजाचा विकास रोखते.” फेक मेसेजवर विश्वास ठेवू नकासोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, सध्याची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित लोकशाहीचा सन्मान राखत, योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या मेळाव्यात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह विलास बडगे, दिनकर कदम, सखाराम मस्के, आर. डी. गायकवाड, अनिल तुरुकमारे, अशोक हिंगे, गणेश वाघमारे, प्रमोद शिंदे, कपिल सोनवणे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. पंचशील नगर व शाहूनगर येथील स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.