बीड (प्रतिनिधी) ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहेमद अन्सारी साहेब यांच्या आदेशावरून ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन बीड यांनी, बीड विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना बिनशर्त पाठिंबा दिला. दरम्यान बीड मतदार संघात आमदार संदीप भैया यांना वाढता पाठिंबा आणि पाठबळ मिळत असल्याने त्यांचा विजय अधिक सुकर झाला आहे.सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी शेख जाकेर महेबुब, मणियार, मोमीन अब्दुल शाके, मोमीन खालिद अब्दुल राउफ, सय्यद फिरोज अली, तांबोळी शफिक, हाजी नसोमोदीन इनामदार, सलाम अब्दुल गफूर शेठ, कुरेशी इरफान अहमद बशीर, शेख ताहेर जाफर, खुर्शीद आलम, शेख वजीर चांद अत्तार, हाजी इकबाल कुरेशी, बागवान जलीम वजीर, शेख मोहसीन वजीर, शेख ताहेर शेख वाहेद, अब्दुल रहीम, ख्वाजा मिया शेख व इतर मान्यवरांनी मला जाहीर पाठिंबा दिला. आ. संदीप भैय्यांनी या सर्व मान्यवरांचे आभार मानते येणाऱ्या २० तारखेला मतदान करताना अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बीड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातील अनेक युवक कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना मागील पाच वर्षात लोकांच्या समस्या जवळून जाणता आल्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. लोकप्रतिनिधी म्हणून हे कर्तव्य बजावले. मतदारसंघाच्या विकासातून आपण जनतेचा विश्वास कमावला आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या,असे आवाहन आ.क्षीरसागर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात आ. संदीप क्षीरसागर, राजेंद्र मस्के, माजी आ. सय्यद सलीम व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सर्वांचे आ. संदीप क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले. आगामी काळात आपल्या खांद्याला खांदा लावून बीड मतदार संघाच्या विकासासाठी काम करू. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या कायम पाठीशी असून बीड मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण सोबत मिळून काम करू अशी ग्वाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.