• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सर्वांगीण विकासासाठी संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 16, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी): यापूर्वी तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच बीड मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित अनेक प्रश्‍न आपल्याला मार्गी लावला आहे. विकासकामे पुर्णत्वास नेता आली. आता असाच आशिर्वाद पाठीशी ठेवून येत्या बुधवार दि.२० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा. आपल्या प्रत्येक मताचा आदर करत मी बीड मतदारसंघांला विकासाच्या आणखी उंचीवर घेवून जावून सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी पेठ बीडमधील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित कॉर्नर बैठकीत केले.

उपस्थित कार्यकर्ते,मतदारांशी पुढे बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, निवडणूक आता अंतीम टप्प्यात आली आहे. आता आपण सर्वांनी आपला पक्का निर्धार करुन पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विचारांची सत्ता आणण्यासाठी आपले मतदान वाया जाणार नाही यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे निश्‍चित करावे. आपले विरोधक इतके दिवस आपल्यावर अनेक आरोप करत आले आहेत. आता तर निवडणूक आहे, मतदारांची दिशाभूल करुन ते आरोप,टिका करतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा,आरोप करुन मतदान मिळेल हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असेन,पण मतदारसंघातील आपण सुजान मतदार बंधू तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मला ओळखता.त्यामुळे विरोधकांचे असे केविलवाणे प्रयत्न आणून पाडण्याची भूमिका घेवून पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही याप्रसंगी संदीप क्षीरसागर यांनी केले.

आपला बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या भूमिकेसोबत,विचारांसोबत राहिलेला आहे. आता संघर्षाच्या स्थितीतही आपण त्यांच्यासोबत कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा व महाविकास आघाडीचा बीडचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आहे. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी वार्ड क्रं १७ मधील आमेर सय्यद व अरबाज शेख यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले.

Previous Post

मालिका अन सामना जिंकत भारतीय संघाचे विक्रमावर विक्रम;एकाच सामन्यात २३ षटकार..

Next Post

मोसंबीच्या पट्ट्यात ३३ हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा विजयसिंहाचा संकल्प….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मोसंबीच्या पट्ट्यात ३३ हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा विजयसिंहाचा संकल्प….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.