बीड(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी शहरातील गांधीनगर भागामध्ये जाहीर सभा घेतली. या सभेला झालेली मतदारांची प्रचंड गर्दी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या विजयाची साक्ष देणारी ठरली. बीड शहर आणि मतदार संघातील माझी जनता हीच माझी खरी ताकद असल्याचे स्पष्ट करत येत्या २० नोव्हेंबरला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांची शुक्रवारी रात्री (दि.१५) प्रचारादरम्यान गांधीनगर येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदार बंधूंची संवाद साधताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, राजकीय स्थिरतेची जी भूमिका घेतली आहे. तीच भूमिका आपल्याला आगामी राजकीय वाटचालीसाठी महत्वाची दूवा ठरणार आहे.
राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून आपण कायम बीड मतदारसंघात विकासाच्या विविध योजना आणून जनतेची कामे केली. प्रलंबित विकासकामे सभागृहात मांडली, लोकहिताचे प्रकल्प पुर्ण व्हावेत म्हणून वारंवार पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांना मंजूरी आणली.भविष्यातही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख आपल्याला उंचावत ठेवायचा आहे. आपल्याकडून सर्वांची कामे व्हावीत,अशी सरळ साधी विचारधारा आणि प्रत्येकाविषयी आपुलकीची भावना ठेवून मी व माझे सर्व सहकारी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत आहोत.
पुढे ते म्हणाले,बीड मतदार संघातील जनेलाही आपला हक्काचा माणूस कोण? आणि आपले प्रश्न सोडवून विकासाच्या दिशेने कोण घेवून जावू शकते? याची जाणीव आहे. सर्व जीवाभावाची माझी जनता माझा आधार आहे. मी कायम जनतेशी इमान राखून त्यांच्या विकासासाठी कटिबध्द राहणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारात विरोधकांच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करुन आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.