
बीड (प्रतिनिधी)
दि.१५ : विना मोबदला घरपोच सेवा ही आमची काम करण्याची पद्धत आहे. विकास हीच जात आणि विकास हाच धर्म सिद्ध करण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर योग्य उमेदवार आहे, त्यामुळे घडीच्या बटनावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे शुक्रवारी (दि.१५) डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद दौऱ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, एकदा निर्णय झाला की बाकीच्या चर्चेला पूर्णविराम मिळतो. मतदारसंघाची तुटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार योगेश क्षीरसागर यांना निवडून देणे अत्यावश्यक आहे. व्यासपीठावर जगदीश काळे, अशोक हिंगे, प्रा.जगदिश काळे, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, सुधाकर मिसाळ, जयश्रीताई मुंडे, गणेश घोलप, प्रकाश ईंगळे, उषाताई सरवदे, मिनाताई उगलमुगले, अक्षय रनखांब, शरद ढाकणे, भगवान पाखरे, माधवराव मोराळे, गहिनीनाथ पाखरे, संजय सानप, सतिश काटे, नवनाथ सानप, वसंत सानप, अभिजीत खाडे, शिवमुर्ती सानप,यांसह अनेक नेत्यांनी योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी मतदारांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सुधाकर मिसाळ यांनी केले. आभार प्रदर्शन सुलेमान पठाण यांनी मानले. यावेळी रायमोह परिसरातील हजारो कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगेश क्षीरसागरांचा विजय निश्चित
अशोक हिंगे म्हणाले, गेल्या निवडणुकीत आम्हाला हिरा दिल्याचे सांगितले गेले, पण तो निखारा ठरला. त्यामुळे आमचा विकास खुंटला. यावेळी जयदत्तअण्णांनी योग्य निर्णय घेत योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित केला आहे.
मराठा आरक्षणाचा मांडला मुद्दा
गणेश घोलप यांनी महायुती सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी जयदत्त अण्णांसारख्या वटवृक्षाला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले.