• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पंकजाताईंच्या आदेशाने घड्याळाला लीड देणार–

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 15, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रुपालीताईं लागल्या प्रचाराला..

गेवराई दि. १५(प्रतिनिधी)
शिवछत्र परिवार हा समाजकारणातून राजकारण करणारा परीवार असून विजयसिंह पंडित हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे आम्हाला घड्याळाचे काम करण्याचा योग आलेला आहे. या योगाला धरूनच विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या आदेशाने घड्याळाला सर्वाधिक लीड देऊ असे आश्वासन भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा राजेगावच्या माजी सरपंच सौ. रूपालीताई कचरे यांनी दिले.

त्या विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित राजेगाव येथील कॉर्नर बैठकीमध्ये बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित माजी उपसभापती शाम मुळे, शरद कचरे, शरद चव्हाण, सलीम शेख, अशोक शेळके, अंगद कचरे, संभाजी कचरे, अमर साळवे यांची प्रमुख होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विजयसिंह पंडित हे प्रगल्भ व दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आपला वाटा आपल्याला भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार विधानसभेमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणून विजयसिंह पंडित यांच्यासारख्या तरुण, दूरदृष्टी असणाऱ्या सर्वसमावेशक नेतृत्वाला मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी राजेगाव पंचायत समिती गणा मधून मोठी लीड देऊ.

राजेगाव गणाची साथ -विजयसिंह पंडित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यावेळी बोलताना म्हणाले की, रूपालीताई या केडर बेस कार्यकर्त्या आहेत. त्या आपल्या सोबत असल्यामुळे राजेगाव गणातून मला चांगले मताधिक्य भेटेल याबद्दल शंका नाही. मी आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देईल. शिवछत्र परिवार हा सर्वसामावेशक भूमिका घेऊन चालणारा परिवार आहे. जुने कार्यकर्ते व सहकार्य केलेले नवीन कार्यकर्ते यांचा समन्वय साधून विकास करण्याची क्षमता शिवछत्र परिवारामध्ये आहे. त्यामुळे आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विधानसभेमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेगाव गावातील व गणतील कार्यकर्ते व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

क्षीरसागर-नाईकवाडे-पटेल-हिंगे-,धांडे यांच्या पाठिंब्याने महायुतीला मोठे पाठबळ….

Next Post

घरपोच सेवा ही आमची कामाची पद्धत ; जयदत्त क्षीरसागर प्रत्यक्ष प्रचारात उतरले….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

घरपोच सेवा ही आमची कामाची पद्धत ; जयदत्त क्षीरसागर प्रत्यक्ष प्रचारात उतरले....

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.