• Contact Us
  • Home
Tuesday, February 3, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

क्षीरसागर-नाईकवाडे-पटेल-हिंगे-,धांडे यांच्या पाठिंब्याने महायुतीला मोठे पाठबळ….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 15, 2024
in ताज्या बातम्या
0

जुन्या सहकाऱ्याना अजितदादांनी पुन्हा एक केले….

बीड (प्रतिनिधी)
दि.१४ : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांची डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये भव्य सभा पार पडली. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीपासून ते चुलते माजी मंत्री जयदत्तआण्णा यांचा पाठींबा, जुने डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे सहकारी अमर नाईकवाडे, फारूक पटेल,अशोक हिंगे,महेश धांडे,शेख तय्यब यांच्या पाठिंब्यापर्यंत अनेक योगायोग जुळून आले. या काळात मुंडे बहीण भावाचे मिळालेले पाठबळ यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल दिसत आहे.

अजितदादा पवारांच्या उपस्थितीत अनेक मोठे प्रवेश झाले. यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद नक्कीच वाढली आहे. डॉ.योगेश यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. अनेक संघटना देखील त्यांना पाठिंबा देत आहेत. डॉ.योगेश यांच्यासाठी आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.प्रीतमताई मुंडे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी देखील सभा घेऊन विजयी करण्याचा निश्चय केला. तसेच, काल खुद्द अजित पवार, धनंजय मुंडे यांनी देखील सभा घेतली. डॉ.योगेश क्षीरसागर यांना मतदारसंघातून जनसामान्य नागरिकांच्या सभा, कॉर्नर बैठका, रॅलीमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे. डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मागील एक ते दीड वर्षात बीड मतदारसंघ पिंजून काढला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत, शांत, संयमी, युवा नेतृत्व असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे त्यांना निवडून विधानसभेत पाठवण्याची तयारी बीड मतदारसंघातील मतदारांनी केली असल्याचे चित्र आहे.

चौकट
असा मिटला राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह

बीडमध्ये सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी योगेश क्षीरसागरांच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली. सभेपूर्वी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये एका ठिकाणी बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व नाराज व्यक्तींची मते जाणून घेतली. या बैठकीला डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांचे आगमन होताच व्यासपीठावर माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, माजी गटनेते फारुक पटेल, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, बबनराव गवते, महादेवराव उबाळे, बाळासाहेब गुजर, बरकत पठाण, अलीम पटेल, जीवन घोलप, रामदास सरवदे, संतोष क्षीरसागर, संभाजी काळे, नंदू गवळी, बाळासाहेब धोत्रे, गौरव जावळे, शकीलखान, आक्रम बागवान असे अनेकजण पोहोचले. या सर्वांनी आता योगेश क्षीरसागरांचे काम जोमाने करण्याचा निर्णय अजितदादांच्या उपस्थितीत घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह सध्यातरी मिटल्याचे चित्र आहे.

Previous Post

मराठा समाज हिंदुत्ववादी, महायुतीच्या पाठीशी-फडणवीसांना विश्वास….

Next Post

पंकजाताईंच्या आदेशाने घड्याळाला लीड देणार–

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पंकजाताईंच्या आदेशाने घड्याळाला लीड देणार--

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.